महिला डब्यात प्रवास करणा:या 46 प्रवाशांवर कारवाई

By Admin | Updated: May 8, 2017 12:07 IST2017-05-08T12:07:30+5:302017-05-08T12:07:30+5:30

भुसावळ रेल्वे स्टेशनवर रेल्वे सुरक्षा बलाकडून कारवाई

Traveling to a female coach: 46 passengers | महिला डब्यात प्रवास करणा:या 46 प्रवाशांवर कारवाई

महिला डब्यात प्रवास करणा:या 46 प्रवाशांवर कारवाई

 भुसावळ,दि.8- महिलांच्या डब्यात घुसखोरी करणा:या 46 प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा बलाने सोमवारी सकाळी कारवाई करत खटले दाखल केल़े उन्हाळी सुटय़ांमुळे रेल्वे गाडय़ांना मोठय़ा प्रमाणात गर्दी आहे त्यामुळे महिलांना प्रवास करणे जिकिरीचे ठरत आह़े रेल्वे सुरक्षा बलातर्फे दररोज महिला डब्यांमध्ये तसेच आरक्षित डब्यात प्रवास करणा:या प्रवाशांविरुद्ध धडक कारवाई केली जात आह़े

सोमवारी सकाळी अप गोवा एक्स्प्रेसमध्ये महिलांच्या डब्यात घुसखोरी करून प्रवास करणा:या 46 प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई करीत त्यांच्याविरुद्ध खटले दाखल केल़े रविवारीदेखील 11 अवैधरित्या खाद्य विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
रेल्वे स्थानक निरीक्षक व्ही़क़ेलांजीवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण मालवीय, एएसआय समाधान वाहुलकर, एएसआय ज़ेएल़शहा,  कैलास कोळी, योगेश भोळे आदींनी ही कारवाई केली़

Web Title: Traveling to a female coach: 46 passengers