कजगावनजीक रस्ता लुटीचा प्रयत्न
By Admin | Updated: June 14, 2017 16:08 IST2017-06-14T16:08:21+5:302017-06-14T16:08:21+5:30
कजगाव चाळीसगाव मार्गावर उमरखेड फाटय़ावर अज्ञातांनी दगडफेक करीत वाहन अडविण्याचे प्रय} केले.

कजगावनजीक रस्ता लुटीचा प्रयत्न
ऑनलाईन लोकमत
कजगाव, जि. जळगाव, दि. 14 - येथून जवळच असलेल्या उमरखेड फाटय़ावर पाच-सहा अज्ञातांनी वाहनांवर दगडफेक करीत रस्तालूट करण्याचा प्रय} केला. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.
कजगाव चाळीसगाव मार्गावर उमरखेड फाटय़ावर अज्ञातांनी दगडफेक करीत वाहन अडविण्याचे प्रय} केले. मात्र कजगावचे बांधकाम ठेकेदार कुमावत यांनी आपले वाहन सरळ चोरटय़ांच्या दिशेने नेल्याने चोरटे काहीसे घाबरले. या मुळे काही वाहनांची सुटका झाली मात्र तो पयर्ंत काही वाहनांचे काच फुटले तर औरंगाबाद येथील सायली दंडगव्हान या मुलीचे डोके फुटले होते.
घटनेची माहिती मिळताच काही वेळातच तरुणांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. गर्दी आपल्याकडे येत असल्याचे चोरटय़ांच्या लक्षात येताच त्यांनी तेथून पळ काढला. त्या दरम्यान चाळीसगाव व भडगाव पोलीस स्टेशनची वाहने घटनास्थळी दाखल झाले, मात्र तो पर्यंत चोरटे फरार झाले होते.