घुसमट असह्य झाल्याने पक्षांतर

By Admin | Updated: September 24, 2014 12:18 IST2014-09-24T12:18:36+5:302014-09-24T12:18:36+5:30

विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांची विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादीचे मंत्री संजय सावकारे यांना भाजपात घेण्याची राजकीय खेळी यशस्वी ठरली

Transit due to intrusive unrest | घुसमट असह्य झाल्याने पक्षांतर

घुसमट असह्य झाल्याने पक्षांतर

भुसावळ : , असे असले तरी सावकारे यांचा हा पक्षप्रवेश आठ महिने आधीच व्हावयाचा होता, असे बोलले जात आहे.

तसे पाहू जाता आमदारकीची सुरुवातीची दोन वर्षे सावकारे पूर्णपणे पक्षासोबत होते. त्यांनी पक्षासाठी कामही केले. त्यामुळे पक्षाने बढती देऊन त्यांना राज्याचे उपाध्यक्षपद दिले. दरम्यान, ते एकनाथराव खडसे यांच्या संपर्कात आले. हा संपर्क वाढत गेला. या दोघांमध्ये सलगी निर्माण झाली आणि खडसे यांनी उच्च शिक्षित व सोज्वळ म्हणून सावकारे यांना जवळ केले. राजकारणातील धडे व डावपेचही सांगितले. यामुळेच की काय सावकारे यांनी त्यांचा निधी आपल्या मतदारसंघाऐवजी मुक्ताईनगर मतदारसंघात खर्च केल्याची चर्चा रंगली. सुमारे २00 कोटी रुपये निधी खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात वापरला. पालकमंत्री असताना तर ते आणि खडसे एकदम जवळ आले.
विधानपरिषद निवडणुकीची किनार
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत तर कमालच झाली. पालकमंत्री म्हणून सावकारे यांची भूमिका चर्चेत राहिली. राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज नामंजूर झाला. त्यामुळे हा सर्व मामला गडबडीचा होता, असे समोर आले. ही बाब पक्षाने त्या वेळी गंभीरपणे घेतली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही याबाबत विचारणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगावला जाहीर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली. हा सर्व मामला सावकारे यांच्या विरोधकांनी पद्धतशीर कॅश करून तो पक्षाकडे पाठविला. तेव्हापासूनच सावकारे पक्षापासून हळूहळू दूर जाऊ लागले व त्यांची जवळीक खडसे यांच्याशी वाढू लागली. याचा प्रत्यय भुसावळला नगराध्यक्ष निवडणुकीत पाहायला मिळाला. सावकारे यांनी स्वकीयांना सोडून पक्षातील चार सर्मथक नगरसेवक आणि भाजपा व खान्देश विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या जोरावर केवळ खडसे यांनी हो म्हटल्याने उमेदवार दिला. मात्र या निवडणुकीत विरोधकांची खेळी वरचढ ठरली. खडसे यांचेच कट्टर सर्मथक अजय भोळे व भावना पाटील यांनी माजी आमदार संतोष चौधरी यांचा उमेदवार अख्तर पिंजारी यांच्या पारड्यात मत टाकून त्यांना नगराध्यक्षपदी बसविले. ही बाब सावकारे यांना पालकमंत्री म्हणून खटकली. याला काही कालावधी होत नाही तोच मुंबईतील बैठकीत शरद पवार यांनी सावकारे यांच्या उपस्थितीत संतोष चौधरी यांना तुमचा उमेदवार कोण, अशी विचारणा केली. याही ठिकाणी त्यांचा स्वाभिमान डिवचला गेला. हे सर्व पक्षात घडत असतानाच अचानक गेल्याच आठवड्यात पक्षाने सावकारे सर्मथक राष्ट्रवादीचे नगरसेवक युवराज लोणारी यांना शहर अध्यक्षपदावरून हटवून सावकारे यांना तुमची गरज नसल्याचा सिग्नल दिला. याच क्षणी सावकारे यांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतला. ते शिवसेनेत जाणार नव्हते. केवळ वेळ काढण्यासाठी त्यांनी तशी गुगली टाकली आणि शरद पवार व अजित पवार भेटत नाहीत. मॅसेजला उत्तर देत नाहीत, अशी कारणे सांगून भाजपात दाखल झाले.
वास्तविक शरद पवार आणि अजित पवार या दोघा नेत्यांशी सावकारे यांची चर्चा झाली होती आणि लोणारींना बदलले हे आपल्याला ठाऊक नसल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरे असे की, सावकारे गटाच्या पदाधिकार्‍यांनी अवलंबिलेले सामूहिक राजीमानाट्यदेखील पक्षात चालले नाही. सुनील तटकरे यांनी राजीनामा पत्र ठेवून घेतले. मात्र ते काहीही बोलले नाहीत. त्यानंतर कार्यकर्ते आठ दिवस मुंबईत थांबून होते. अखेर भाजपात जाण्याचा निर्णय पक्का होताच कार्यकर्त्यांनी मुंबई सोडली. 
 
लोकसभा निवडणुकीतही नाराजी..! 
■ लोकसभा निवडणूक काळात शरद पवार व अजित पवार यांच्या सभा झाल्या. त्यात सावकारे यांच्याऐवजी संतोष चौधरी यांचाच वावर जास्त होता. अजित पवार यांच्या सभेला सावकारे हजर नव्हते. इतकेच नव्हे तर लोणारी मंगल कार्यालयात भोजनाची व्यवस्था असताना अजित पवारांनी चौधरींकडील पाहुणचार घेतला. मोठय़ा पवारांच्या रावेर येथील कार्यक्रमात चौधरी पुढे होते. त्यांच्या सर्मथकांचे स्वागत स्वीकारण्यात आले. यातून नाराजी वाढत गेली व आता रिझल्ट समोर आहे. 
 
 
नेहमीच वेगळी वागणूक.. 
■ आमदार आणि नंतर मंत्री म्हणून आपल्याला एका गटाकडून नेहमीच वेगळी वागणूक देण्यात आल्याची खंत सावकारे यांनी अनेकदा खाजगीत कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केली आहे. प्रोटोकॉल असतानाही मी कोठे बसावे हे आधीच ठरलेले असायचे. याला जातीयता म्हणायचे वा अन्य काही. या शब्दात त्यांनी अनेकदा भावना व्यक्त केल्या आहेत. या सर्व वेदना पक्ष बदलण्यास पुरेशा आहेत, असे त्यांचे सर्मथक म्हणत आहेत. 
 
--------------
१८0 एकूण मतदारसंघअर्ज विक्री दाखल अर्ज उमेदवारी अर्जांची स्थिती - 0५ चाळीसगाव- ११ पाचोरा- 0३ एरंडोल- १0 चोपडा- १६ अमळनेर- १६ जामनेर- २५ मुक्ताईनगर- १२ भुसावळ - ४१ रावेर- २१ ग्रामीण- २0 जळगाव

Web Title: Transit due to intrusive unrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.