जळगावचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांची बदली
By अमित महाबळ | Updated: August 1, 2023 18:47 IST2023-08-01T18:47:02+5:302023-08-01T18:47:10+5:30
रिक्त जागेवर अद्याप कोणाची नियुक्ती झालेली नाही.

जळगावचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांची बदली
जळगाव : जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांची नाशिक जिल्ह्यात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर अद्याप कोणाची नियुक्ती झालेली नाही.
नितीन बच्छाव यांनी २ फेब्रुवारी २०२२ रोजी, जळगाव जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी नुकताच विनंती बदलीसाठी अर्ज केला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर अद्याप कोणाचीच नियुक्ती झालेली नाही. मंगळवारी, बदलीचे आदेश प्राप्त होताच बच्छाव यांनी आपला पदभार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनात चांगले काम करता आले. जळगावमधील कार्यकाळात शिक्षण संस्थांचे अनुदान, शिक्षकांची प्रलंबित प्रकरणे ही सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने निकाली काढता आली याचे समाधान असल्याचे नितीन बच्छाव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील (डायट) वरिष्ठ अधिव्याख्याता जयश्री ताराचंद पाटील यांची धुळे येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत बदली झाली आहे.