जिल्ह्यात २६ प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:19 IST2021-08-26T04:19:10+5:302021-08-26T04:19:10+5:30
शनी पेठचे निरीक्षक विठ्ठल ससे यांची सुरक्षा शाखेत बदली झाली असून, त्यांच्या जागी सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळिराम हिरे ...

जिल्ह्यात २६ प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या
शनी पेठचे निरीक्षक विठ्ठल ससे यांची सुरक्षा शाखेत बदली झाली असून, त्यांच्या जागी सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळिराम हिरे यांना नियुक्त करण्यात आले आहे. नाशिक येथून नव्याने दाखल झालेले कांतीलाल पाटील यांना चाळीसगाव शहरला नियुक्ती देण्यात आली आहे, तर आठवडाभरापूर्वीच रामानंदला नियुक्ती झालेले किरण शिंदे यांना जामनेर पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षकांचे वाचक असलेले सिद्धेश्वर आखेगावकर यांना फैजपूर, तर अपर पोलीस अधीक्षकांचे वाचक जयेश खलाणे यांना मारवडचे प्रभारी बनविण्यात आलेले आहे. चार महिन्यांपूर्वीच पहूरला नियुक्ती दिलेले सहायक निरीक्षक स्वप्निल नाईक यांना भुसावळ शहर वाहतूक शाखेचे प्रभारी बनविण्यात आले आहे. जळगाव शहर वाहतूक शाखेचे देविदास कुणगर यांना चोपडा ग्रामीणला नियुक्ती देण्यात आली आहे.
अशा आहेत निरीक्षकांच्या बदल्या
अधिकारी सध्याचे ठिकाण नवीन नियुक्ती
विठ्ठल ससे शनी पेठ सुरक्षा शाखा
बाबासाहेब ठोंबे भुसावळ शहर जिल्हा विशेष शाखा
रामकृष्ण कुंभार भुसावळ तालुका जळगाव तालुका
रामदास वाकोडे रावेर जिल्हा पेठ
विजयकुमार ठाकूरवाड चाळीसगाव शहर जळगाव शहर
प्रताप इंगळे जामनेर भुसावळ शहर
देविदास कुनगर जळगाव वाहतूक शाखा चोपडा ग्रामीण
किरण शिंदे नियंत्रण कक्ष जामनेर
कैलास नागरे बुलडाण्याहून हजर रावेर
विजय शिंदे नाशिक येथून हजर रामानंद नगर
शंकर शेळके वाशिम येथून हजर धरणगाव
कांतीलाल पाटील नाशिक येथून हजर चाळीसगाव शहर
अंबादास मोरे धरणगाव मानव संसाधन विभाग
विलास शेंडे जिल्हा पेठ भुसावळ तालुका
दिलीपसिंग पाटील सुरक्षा शाखा नियंत्रण कक्ष
लिलाधर कानडे नियंत्रण कक्ष शहर वाहतूक
बळिराम हिरे सायबर पोलीस ठाणे शनी पेठ
संतोष भंडारे नियंत्रण कक्ष पारोळा
अरुण धनवडे मानव संसाधन पहूर
अशा आहेत सहायक निरीक्षकांच्या बदल्या
अधिकारी सध्याचे ठिकाण नवीन नियुक्ती
अनिल मोरे भुसावल बाजार पेठ नशिराबाद
सिध्देश्वर आखेगावकर वाचक १ फैजपूर
नीता कायटे पिंपळगाव हरेश्वर कासोदा
कृष्णा भोये भुसावळ बाजारपेठ पिंपळगाव हरेश्वर
जयेश खलाणे वाचक २ मारवड
स्वप्नील नाईक पहूर वाहतूक शाखा भुसावळ
आशिषकुमार अडसूळ नाशिक येथून हजर वरणगाव