‘त्या’ प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे आजपासून प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:45 IST2021-02-20T04:45:15+5:302021-02-20T04:45:15+5:30

प्रभाव लोकमतचा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या स्थगितीचा निर्णय नुकताच उठविण्यात आला आहे. या उमेदवारांचे २० ...

Training of ‘those’ trainee candidates from today | ‘त्या’ प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे आजपासून प्रशिक्षण

‘त्या’ प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे आजपासून प्रशिक्षण

प्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या स्थगितीचा निर्णय नुकताच उठविण्यात आला आहे. या उमेदवारांचे २० फेब्रुवारीपासून नेरी नाका येथील कार्यशाळेत प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील चालक-वाहक मिळून १७१ उमेदवारांचा समावेश आहे.

एसटीच्या प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण कोरोनामुळे थांबले या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने १४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केले होते. यामध्ये प्रशिक्षणार्थींच्या व्यथा ‘लोकमत’ने मांडली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने हा निर्णय घेतला. गेल्या वर्षी जून महिन्यात कोरोनामुळे या उमेदवारांचे प्रशिक्षण अर्ध्यावरच थांबविण्यात आले होते. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर, पुन्हा प्रशिक्षणासाठी बोलाविण्याबाबत या प्रशिणार्थी तरुणांनी महामंडळाकडे मागणी लावून धरली होती. अखेर महामंडळाने त्यांची मागणी करून, त्यांचे प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रशिक्षणार्थी तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महामंडळातर्फे दूरध्वनी व मेलद्वारे या प्रशिक्षणार्थी उमेदवारांना प्रशिक्षणाविषयी कळविण्यात आल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी सांगितले.

Web Title: Training of ‘those’ trainee candidates from today