रोटरी क्लबतर्फे चोपडा येथे प्रशिक्षण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:12 IST2021-06-21T04:12:41+5:302021-06-21T04:12:41+5:30

या प्रशिक्षण शिबिरात मुख्य मार्गदर्शक म्हणून इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष गनी मेमन उपस्थित होते. त्यांनी आरसीसी क्लब ...

Training camp at Chopda by Rotary Club | रोटरी क्लबतर्फे चोपडा येथे प्रशिक्षण शिबिर

रोटरी क्लबतर्फे चोपडा येथे प्रशिक्षण शिबिर

या प्रशिक्षण शिबिरात मुख्य मार्गदर्शक म्हणून इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष गनी मेमन उपस्थित होते. त्यांनी आरसीसी क्लब स्थापनेचे उद्दिष्ट व उद्देश तसेच ग्रामीण भागातील विविध समस्या सोडवण्यासाठी क्लबची रचना, सहकार्य तसेच विविध शासकीय योजनांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवून त्यांच्या पूर्ततेसाठी क्लबने करावयाचा पाठपुरावा इत्यादी विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.

यावेळी रोटरीचे सह प्रांतपाल योगेश भोळे, रुरल इनक्लेव चेअर संगीता पाटील, गोल्ड सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. गोविंद मंत्री, रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव, सचिव ॲड. रुपेश पाटील, आरसीसी कमिटी अध्यक्ष ईश्वर सौंदानकर उपस्थित होते. या शिबिरात विकी निकम (वेले), पन्नालाल पवार (उमर्टी), गोपाल पाटील (बोरअजंटी), विनोद पाटील (सत्रासेन), विशाल गवळी(वराड), प्रदीप पाटील (तावसे), प्रणव ठाकरे (मंगरूळ), चंद्रकांत पाटील (खडगाव), मनोज पाटील (रुखन खेडा), मुकेश पाटील (चहार्डी), हर्षल माळी (आडगाव), किरण बडगुजर (अकुलखेडा), समाधान पाटील (चौगाव), विशाल धनगर (नरवाडे), भूपेंद्र धनगर (तांदलवाडी), सुरेश पाटील (खेडीभोकरी), ललित पाटील (गोरगावले खुर्द), राकेश पाटील (काजीपुरा), शुभम पाटील (खर्डी), नरेंद्र पाटील (लोणी), मोहन चव्हाण (वर्डी), दीपक पाटील (हातेड), भूषण पाटील (अडावद), महेंद्र माळी (लासूर) या सर्व अध्यक्षांना रोटरी इंटरनॅशनलकडून त्या त्या गावांसाठी प्राप्त झालेले आरसीसीचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

एकूण चोवीस गावांच्या प्रतिनिधींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी तर सूत्रसंचालन गौरव महाले, आभार प्रदर्शन रोटरी सचिव रुपेश पाटील यांनी केले.

===Photopath===

200621\20jal_9_20062021_12.jpg

===Caption===

रोटरी क्लबतर्फे चोपडा येथे प्रशिक्षण शिबिर

Web Title: Training camp at Chopda by Rotary Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.