तांत्रिक कामामुळे रेल्वे गाड्यांना विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:16 IST2021-03-14T04:16:12+5:302021-03-14T04:16:12+5:30

जंतूनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी जळगाव : मू. जे. महाविद्यालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनियमित साफसफाई होत असल्यामुळे, मोठ्या ...

Train delays due to technical work | तांत्रिक कामामुळे रेल्वे गाड्यांना विलंब

तांत्रिक कामामुळे रेल्वे गाड्यांना विलंब

जंतूनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी

जळगाव : मू. जे. महाविद्यालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनियमित साफसफाई होत असल्यामुळे, मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी साथीचे आजार पसरण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने या परिसरात जंतूनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी

जळगाव : सध्या शहरात महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे, दादावाडी परिसरात दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी वाहनांच्या अक्षरश: रांगा लागत आहेत. तरी वाहतूक विभागाने या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.

उद्यानातील अस्वच्छतेमुळे नागरिकांना त्रास

जळगाव : जिल्हा परिषदे जवळील श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानात नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे, अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. यामुळे फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने या ठिकाणी स्वच्छता मोहिम हाती घेण्याची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.

Web Title: Train delays due to technical work