मनमाड यार्डात मालगाडीचा डबा घसरला

By Admin | Updated: April 24, 2017 12:31 IST2017-04-24T12:31:17+5:302017-04-24T12:31:17+5:30

मनमाड यार्डात येत असलेल्या मालगाडीचा एक डबा रूळावरून घसरण्याची घटना रविवारी रात्री 8़38 वाजता घडली़

The train carriage collapsed in Manmad Yard | मनमाड यार्डात मालगाडीचा डबा घसरला

मनमाड यार्डात मालगाडीचा डबा घसरला

भुसावळ, दि.24- मनमाड यार्डात येत असलेल्या मालगाडीचा एक डबा रूळावरून घसरण्याची घटना रविवारी रात्री 8़38 वाजता घडली़  दरम्यान, या प्रकारामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली़
गहू घेऊन मेहदीपूर रोड येथून जालनाकडे निघालेली 42 डब्यांची मालगाडी मनमाड यार्डात येत असतानाच गार्डच्या डब्यापासून 13 क्रमांकाचा डबा रेल्वे रूळाखाली घसरला़ या प्रकारानंतर रेल्वेच्या कर्मचा:यांनी धाव घेतली़ यार्डात घटना घडल्याने वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही़

Web Title: The train carriage collapsed in Manmad Yard