- हितेंद्र काळुंखे, अमळनेर (जि. जळगाव)भुसावळहून नंदुरबारकडे जाणाऱ्या मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले. सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नाही. लोको पायलट आणि गार्ड सुरक्षित आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाजवळ घडली. यामुळे सुरत- भुसावळ मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
मालगाडीचे डब्बे रुळावरुन घसरल्याने आजूबाजूचे ट्रॅक देखील खराब झाले आहेत. त्यामुळे सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे.
अमळनेर स्टेशनपासून काही अंतरावरच ही घटना घडल्याने अधिकारी लगेचच घटनास्थळी पोहचले. दुरुस्ती कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नेमका अपघात कसा झाला, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.