शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कर्ज फेडण्यासाठी आंध्रप्रदेशातून गांजाची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:32 IST

नातेवाईकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी थेट आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम (पांडेल) येथून अलिशान कारमधून गांजाची तस्करी करणाºया सुनील माधवराव मोहीते (वय २४, रा.कनाशी, ता.भडगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री कजगाव, ता.भडगाव येथे पकडले. त्याच्याकडून साडे सहा लाख रुपये किमतीचा गांजा व साडे तीन लाख रुपये किमतीची गाडी जप्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे डी.जे.गाडीसह कजगावात एकास पकडले   पोलीस निरीक्षक सुनील कुराडेच बनले डी.जे.चे ग्राहकसाडे सहा लाखाचा गांजा पकडला

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२९ : नातेवाईकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी थेट आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम (पांडेल) येथून अलिशान कारमधून गांजाची तस्करी करणाºया सुनील माधवराव मोहीते (वय २४, रा.कनाशी, ता.भडगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री कजगाव, ता.भडगाव येथे पकडले. त्याच्याकडून साडे सहा लाख रुपये किमतीचा गांजा व साडे तीन लाख रुपये किमतीची गाडी जप्त करण्यात आली आहे.

कनाशी येथील एक तरुण आंध्र प्रदेशातून अलिशान कारमधून गांजा आणून तो डी.जे.च्या गाडीतून गावोगावी विक्रेत्यांना होलसेल भावात विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे  पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळाली होती. त्यानुसार कुराडे हे स्वत: शनिवारी रात्री पथकासह कजगाव भागात गेले होते. कुराडे, रामकृष्ण पाटील व महेश पाटील या तिघांनी वेशांतर करुन चाळीसगाव-भडगाव दरम्यान एका ठिकाणी डी.जे.ची गाडी थांबविली. आमच्याकडे लग्न आहे, त्यासाठी डी.जे.लावायचा आहे असे सांगून चालक सुनील मोहीते याची चौकशी करायला सुरुवात करताच लांब अंतरावर थांबलेले उपनिरीक्षक प्रकाश इंगळे, सहायक फौजदार मनोहर देशमुख, रवींद्र गायकवाड, दिलीप येवले, सतीश हळणोर, विनोद पाटील, रवींद्र घुगे, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, अशोक चौधरी, दत्तात्रय बडगुजर, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, प्रकाश महाजन, मनोज दुसाने, शरद सुरळकर, रामचंद्र बोरसे, गफूर तडवी, प्रविण हिवराळे, जयंत चौधरी व इद्रीस पठाण यांनी गाडीला गराडा घातला. पोलिसांचा ताफा पाहून मोहीतेची भंबेरी उडाली. गाडीचा तपासणी केली असता त्यात साडे सहा लाख रुपये किमतीचा ६५ किलो गांजा आढळून आला.

भडगावला कमी किमतीत गांजा मागितल्याने फसला भडगाव येथे सुरेश नावाचा एक जण गांजा विक्रीचा व्यवसाय करतो. तो मोहितेकडून गांजा विकत घेणार होता, त्यानुसार मोहीते त्याच्याकडे गेला, मात्र त्याने अगदी कमी किमतीत गांजा मागितला, त्यामुळे त्याला गांजा न देता तो तेथून माघारी फिरला व नगरदेवळा स्टेशनजवळ कारमधील गांजा डी.जे.च्या गाडीत टाकून दुसरा ग्राहक शोधण्यासाठी कजगावकडे येत असताना पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याच्याविरुध्द भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मोहीते याला अटक करण्यात आली आहे.