मुक्ताईनगरला मुख्य चौकात वाहतूक नियमांचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:45 IST2020-12-04T04:45:06+5:302020-12-04T04:45:06+5:30
मुक्ताईनगर : शहरातील मुख्य प्रवर्तन चौकात वाहतूक नियमांची खुलेआमपणे पायमल्ली वाहनधारक करत असल्याने दररोज अपघातांना आमंत्रण मिळत असते. ...

मुक्ताईनगरला मुख्य चौकात वाहतूक नियमांचा फज्जा
मुक्ताईनगर : शहरातील मुख्य प्रवर्तन चौकात वाहतूक नियमांची खुलेआमपणे पायमल्ली वाहनधारक करत असल्याने दररोज अपघातांना आमंत्रण मिळत असते. यामुळे एखाद्या वेळेस मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरातील मुख्य प्रवर्तन चौकात मुख्य रस्त्यावर सर्कल उभारण्यात आलेले आहे. या सर्कल जवळून एक रस्ता बऱ्हाणपूर, मध्य प्रदेशकडे, दुसरा वरणगाव, भुसावळकडे, तिसरा बोदवडकडे व चौथा रस्ता शहरातील जुने गाव परिसरात जाणारा आहे. वाहनधारकांनी डाव्या बाजूने वाहने चालविणे अपेक्षित असताना शहरात मात्र कधीही वाहतुकीचे नियम पाळताना वाहनधारक दिसून येत नाही. अक्षरश: चुकीच्या दिशेने वाहन चालवले जात असल्याने किरकोळ अपघात या चौकात नेहमी होत आहेत. प्रवर्तन चौकात पोलीस हे कर्तव्यावर असले तरी अद्यापही वाहनधारकांना शिस्त लावण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येत आहे.
फोटो कॅप्शन
1) मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात चुकीच्या दिशेने येणारी रिक्षा.
2) चुकीच्या दिशेने वाहन आणल्याने किरकोळ अपघातानंतर झालेली गर्दी, वाहने व उपस्थित पोलीस कर्मचारी.
(छायाचित्र विनायक वाडेकर, मुक्ताईनगर)