शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विमान कंपनी विरोधात प्रवाशांची पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:45 IST

गैरसोय : सेवा रद्दबाबत विमान कंपनीकडून प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे ; जळगावातील प्रवासी संतप्त, सततच्या प्रकारामुळे सर्वत्र नाराजी

जळगाव : अहमदाबादहून सकाळी जळगावला येणारे विमान दाट धुक्यांमुळे रद्द करण्यात आले. सायंकाळीदेखील औरंगाबादला येणारे विमान दाट धुक्यांमुळे रद्द करण्यात आले. विमान रद्द झाल्याची प्रवाशांना ऐववेळी माहिती देण्यात आली. प्रवाशांनी चौकशी केल्यावर विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे जळगावतील संतप्त झालेल्या प्रवाशांनी ट्रू जेट या विमान कंपनीविरोधात अहमदाबाद विमानतळ पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली आहे.जळगावातील प्रवासी तक्रारदार डॉ. नरेंद्र गुजराथी, त्यांच्या पत्नी प्रीती गुजराथी व इतर प्रवाशांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते २३ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथून सकाळी ९ च्या विमानाने जळगावला येणार होेते. त्यानुसार ते वेळेवरच अहमदाबाद विमानतळावर आले. विमानाची वेळ झाल्यानंतर प्रवाशांनी विमान कंपनीकडे चौकशी केली असता तेव्हा कोणतीच माहिती देण्यात आली नाही, मात्र तासाभराने या प्रवाशांना दाट धुक्यांमुळे विमान रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. ऐनवेळी ही माहिती दिल्याने प्रवाशांनी नाराजी व संताप व्यक्त केला.यावेळी विमान कंपनीने या प्रवाशांना सायंकाळच्या अहमदाबाद ते औरंगाबाद या विमानाने जळगावच्या प्रवाशांना औरंगाबाद पर्यंत सोडणार असल्याचे सांगितले. त्यानुसार हे प्रवासी विमान तळावरच थांबून होते. मात्र, सायंकाळी ५ वाजता या प्रवाशांना पुन्हा दाट धुक्यांमुळे औरंगाबादची सेवादेखील रद्द झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे प्रवाशी संतप्त झाले. यावेळी प्रवाशांनी काहीही करुन, आम्हाला जळगाव किंवा औरंगाबादला सोडण्याची मागणी केली. मात्र, विमान कंपनीने प्रवाशांची कुठलीही मागणी न ऐकता या प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे दिली.अन् प्रवाशांनी गाठले पोलिस स्टेशनसकाळची व सायंकाळचे विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशांनी थेट अहमदाबाद विमानतळ पोलीस स्टेशनात धाव घेतली. विमान कंपनीकडून सेवा रद्दबाबत ऐनवेळी माहिती देण्यात आल्याने गैरसोय झाल्याची तक्रार केली. विमान कंपनीने समाधानकारक उत्तरे न दिल्याने झालेल्या मानसिक त्रासाची विमान कंपनीविरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. दरम्यान, सायंकाळचीदेखील सेवा रद्द झाल्याने जळगावातील प्रवासी अहमदाबादहून हावडा एक्सप्रेसने सकाळी जळगावला आल्याचे तक्रारदार डॉ. नरेंद्र गुजराथी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाJalgaonजळगाव