वाहतूकीची कोंडी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:44 IST2020-12-04T04:44:13+5:302020-12-04T04:44:13+5:30
अंतर्गत रस्त खोदले जळगाव : शहरात ठिकठिकाणी पाईपलाईनचे काम सुरू असल्याने अनेक अंतर्गत रस्ते खोदण्यात आले आहे. गांधीनगरातही असेच ...

वाहतूकीची कोंडी कायम
अंतर्गत रस्त खोदले
जळगाव : शहरात ठिकठिकाणी पाईपलाईनचे काम सुरू असल्याने अनेक अंतर्गत रस्ते खोदण्यात आले आहे. गांधीनगरातही असेच रस्ते खोदण्यात आल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. खोदकाम झाल्यानंतर व्यवस्थित ते बुजले जात नसल्याने रस्त्यांचे बारा वाजून वाहनधारकांना माेठ्या त्रासाचा सामना करावा लागत असल्याचे गंभीर चित्र या रस्त्यांवर आहे. महापालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
२२ डिसेंबरला सभा
जळगाव : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधरण सभेचे २२ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. ही सभा ऑफलाईन होणार आहे. कोरोना बाबत सर्व खबरदारी घेऊन आता पुढील सर्वच सभा ऑफलाईन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या आधी ४ डिसेंबरला स्थायि समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, निधीच्या मुद्दयावरून ही सभा गाजण्याची चिन्हे आहेत.
वसुंधरा अभियनाचा आढावा
जळगाव : जिल्ह्यातील बारा गावांमध्ये वसुंधरा अभियान राबविले जात असून या अभियानाचा ५ डिसेंबर रोजी आढावा घेतला जाणार आहे. जिल्हा परिषदेत याबाबत बैठक होणार आहे. बारा गावांमध्ये पृथ्वी, जल, आकाश, वायू, अग्नी अशा पाच सूत्रांमध्ये काम करून पर्यावरण संरक्षणात उत्तम कामगिकरी करणाऱ्या गावांना बक्षीस दिले जाणार आहे. यासाठी १२ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
पोलिओबाबत नियोजन
जळगाव : जिल्ह्यात जानेवारी महिन्यात पल्स पोलिओ अभियान राबविले जाणार आहे. यंदा मात्र, कोरोनामुळे हे अभियान वेगळ्या स्वरूपात राबवयाचे असून यासाठी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जि. प. सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली आहे. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे गर्दी टाळत हा कार्यक्रम राबवावा लागणार आहे. याबाबत नुकत्याच बैठकीतही चर्चा करण्यात आली होती.
गंभीर रुग्ण कमी
जळगाव : जिल्हाभरातील ऑक्सिजनचा पुरवठा कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या बुधवारी १७ ने घटून ७३ वर आलेली आहे. ही संख्या मंगळवारी ९० वर पोहोचली होती. तर अतिदक्षता विभागातील रुग्णांची संख्या मात्र स्थिर आहे. तर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेणार्यांची संख्या १०७ आहेत. सक्रीय रुग्णांपैकी ३२५ रुग्णांना कोणतेही लक्षणे नाहीत.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
जळगाव : राष्ट्रवादी कॉँग्रेसची बैठक आटोपल्यानंतर पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशा फज्जा उडाला होता. अनेकांनी मास्क परिधान केले नव्हते, भाषण करताना अनेक पदाधिकाऱ्यांनी हा मुद्दा मांडला होता. मात्र, बैठकीत गर्दीवर नियंत्रण नसल्याचे गंभीर चित्र होते. त्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठीचे नियम पायदळी तुडवण्यात आल्याचे चित्र होते.
जळगाव १५ हजार पार
जळगाव : जळगाव तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येने १५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. रुग्णसंख्या १५हजार १४३ वर पोहोचलेली आहे. यात मृतांची संख्या ३५९ झाली आहे. तर १७९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. मध्यंतरी जळगाव तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या ३ हजारापर्यंत पोहोचली होती. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती.