पारोळ्यात गर्दीमुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:12 IST2021-06-21T04:12:58+5:302021-06-21T04:12:58+5:30
पारोळा तालुक्याचा रविवार आठवडे बाजाराचा असतो. यावेळी धुळे, भडगाव,चाळीसगावसह अन्य ठिकाणाचे कैरी व्यापारी कैरी विकण्यासाठी पारोळा बाजारपेठेत येत असतात. ...

पारोळ्यात गर्दीमुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी
पारोळा तालुक्याचा रविवार आठवडे बाजाराचा असतो. यावेळी धुळे, भडगाव,चाळीसगावसह अन्य ठिकाणाचे कैरी व्यापारी कैरी विकण्यासाठी पारोळा बाजारपेठेत येत असतात. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठा कैरी बाजार भरतो. या ठिकाणी पारोळा तालुक्यासह अमळनेर, धरणगाव, एरंडोल भडगाव तालुक्यांत लोक कैरी विकत घेण्यासाठी येत असतात. यामुळे मोठ्या संख्येने गर्दी होते. या गर्दीमुळे महामार्गावर वाहनांची संख्या वाढते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक ठप्प होते.
रविवारीही सकाळी ७.३० वाजण्यापासून वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी मोठ्या परिश्रमातून ही वाहतूक सुरळीत केली; पण लग्नासाठी जाणाऱ्या वधू-वरांच्या गाडी अडकून पडल्याने त्यांना लग्नस्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याने विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला वेग आणून ते काम पूर्ण करूनही वाहतूक नव्या महामार्गावरून सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
===Photopath===
200621\20jal_11_20062021_12.jpg
===Caption===
पारोळा येथे भरलेल्या कैरी बाजारमुळे महामार्गावर ठप्प झालेली वाहतूक.