सुरत रेल्वेगेटवर पुन्हा वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:13 IST2021-06-18T04:13:05+5:302021-06-18T04:13:05+5:30
१५ हॉकर्सवर कारवाई जळगाव - शहरातील मुख्य रस्त्यालगत व्यवसाय करण्यास हॉकर्सला बंदी घालण्यात आली असली तरीही अनेक हॉकर्स मनपाच्या ...

सुरत रेल्वेगेटवर पुन्हा वाहतूक कोंडी
१५ हॉकर्सवर कारवाई
जळगाव - शहरातील मुख्य रस्त्यालगत व्यवसाय करण्यास हॉकर्सला बंदी घालण्यात आली असली तरीही अनेक हॉकर्स मनपाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे गुरुवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून १५ हॉकर्सवर कारवाई करून, त्यांच्याकडील माल जप्त करण्यात आला.
दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
जळगाव - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनने जोरदार आगमन केले आहे. यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत मान्सून उशिराने पोहचला असला तरी दोन दिवसात ज्याप्रमाणे पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार जून महिन्याची पावसाची सरासरी गाठली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून आगामी दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सायंकाळी ४.३० ते रात्री ८ वाजेदरम्यान जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भाजपकडून सेवा ही संघटना पर्वा अंतर्गत कार्यक्रम
जळगाव - भाजपचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृती दिनानिमित्त भाजपकडून ‘सेवा ही संघटना पर्व’ हा पंधरवडा साजरा केला जाणार आहे. त्यानुसार २१ जून ते ६ जुलै दरम्यान भाजप महानगरकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी गुरुवारी भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक भाजप कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा चिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, दीपक साखरे, मनोज भांडारकर उपस्थित होते. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून या पंधरवड्याला सुरुवात होणार आहे.