Traffic conditions due to bus stops | बस फेऱ्या बंदमुळे प्रवाशांचे हाल
बस फेऱ्या बंदमुळे प्रवाशांचे हालपारोळा : अमळनेर आगाराने पारोळा ते वेल्हाणे मार्गावरील सर्व बस फेऱ्या बंद केल्याने शेकडो विद्यार्थी व प्रवाशांचे हाल झाले.
या मार्गावर विचखेडे, करंजी, मुंदाने, सोके, शेवगे, बोळे, कराडी, ढोली, वेल्हाणे आदी गावे येतात. या गावांतील ज्येष्ठ नागरिक व शाळा- महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्रवासाचे दुसरे साधन नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांनी पासेस काढलेल्या असूनही बस फेºया बंद आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
या मार्गावरील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला अनेक वेळेस निवेदने दिली. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. ग्रामस्थ व विद्यार्थी उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी एसटी महामंडळाविरोधात जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देणार असल्याचे सांगितले आहे.

 

 

Web Title:  Traffic conditions due to bus stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.