वरखेडी येथील पारंपरिक उत्सव यावर्षीदेखील खंडितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST2021-09-03T04:16:32+5:302021-09-03T04:16:32+5:30

वरखेडी, ता. पाचोरा : मागीलवर्षी २४ मार्च २०२१पासून कोविडच्या महामारीमुळे प्रत्येकाला आपल्या जिवाची काळजी घेण्यासाठी शासनाने अनेक निर्बंध लादले. ...

The traditional festival at Varkhedi is also broken this year | वरखेडी येथील पारंपरिक उत्सव यावर्षीदेखील खंडितच

वरखेडी येथील पारंपरिक उत्सव यावर्षीदेखील खंडितच

वरखेडी, ता. पाचोरा : मागीलवर्षी २४ मार्च २०२१पासून कोविडच्या महामारीमुळे प्रत्येकाला आपल्या जिवाची काळजी घेण्यासाठी शासनाने अनेक निर्बंध लादले. जनता सुरक्षित रहावी. यासाठीच शासनाला कठोर निर्णयांची अंमलबजावणी करीत आहे.

सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये व संसर्ग वाढू नये यासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. मंदिर, गुरुद्वारा, प्रार्थना स्थळ बंद करण्यात आले व कोरोनाला हरवण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात आली. परंतु, सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट डेल्टा प्लस या नवीन विषाणूमुळे पूर्वपदावर येणाऱ्या जनजीवनाला अजूनही काही निर्बंधांचे पालन करण्यासाठी शासनाने रमजान ईद, बैलगाडी शर्यत, दहीहंडी, पोळा व गाव परंपरेनुसार साजरे केले जाणारे सण, उत्सवांवर बंदी लावण्यात आली आहे. यामुळे वरखेडीसह पंचक्रोशीतील जनतेला बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी वरखेडी येथे परंपरेनुसार बारागाड्या ओढण्याचा उत्सव साजरा केला जातो व श्रावणमासाची सांगता होते.

यावेळी हजारोंच्या संख्येने गावातील व पंचक्रोशीतील बाया, माणसे, मुले यांची अलोटगर्दी उसळत असते. यामुळे संभाव्य धोका नजरेसमोर ठेवून पोळा व बारागाड्या ओढण्याच्या उत्सवाची परंपरा सलग दुसऱ्यावर्षीदेखील खंडित राहणार आहे. आजवर शंभर-दीडशे वर्षांची ही परंपरा खंडित झालेली नाही.

Web Title: The traditional festival at Varkhedi is also broken this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.