शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

आबाद आणि बरबाद करणाऱ्या जुगार खेळण्याची खान्देशात परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 16:07 IST

अक्षय तृतीयेनिमित्त जळगावात ‘पत्तास ना डाव, अन् मामानं गाव’

ठळक मुद्देतीन पत्ती, फटका, झन्ना-मन्नावर कोट्यवधीची उलाढालजुगाराला मिळते या दिवशी प्रतिष्ठारावाचा रंक आणि रंकाचा राव

विलास बारी/ आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१८ - अक्षय आनंद देणाºया अक्षय तृतीयेचा सण म्हटला म्हणजे खान्देशात आनंदाला उधाण असते. सासुरवाशिणीचा विरंगुळा, कृषी संस्कृतीचा कळवळा आणि पूर्वजांचे स्मरण ही संस्कृती आणि परंपरा खान्देशवासियांकडून यानिमित्ताने जोपासल्या जात असताना या दिवशी खान्देशातील अनेक कुटुंब आबाद आणि बरबाद करणारा पैसे लावून जुगार खेळण्याची प्रथा वर्षानुवर्षे सुरु आहे.पत्तास ना डाव, अन् मामानं गावमावशीसना मान, मामीले तानबहिनीसना हेका, पाहिजे झोकाआम्बानं जेवण, ऊना आखाजी ना सणअसे अक्षय तृतीया या सणाचे महत्त्व खान्देशात आहे. वर्षभर सासरी काम करून उन्हाळ्याच्या दिवसात माहेरी येऊन आराम करण्यासाठी विवाहितेला नेहमी अक्षय तृतीयेची आस असते. माहेरी आल्यानंतर आपल्या जुन्या मैत्रिणींसोबत झोका खेळून गौराईचे गाणे म्हणण्यात विवाहितांची चढाओढ सुरु होते. चैत्र वैशाखांच्या उन्हामुळे जमीन भाजून निघाल्यानंतर जमिनीच्या मशागतीसाठी गावागावात सालदाराची नियुक्ती देखील याच सणाच्या निमित्ताने होत असते. घरातील पितरांचे पूजन व घागर भरून पूजन करण्याची प्रथा याच निमित्ताने अव्याहत सुरु आहे.गल्लोगल्लीत जुगार अड्डेचैत्र वैशाख महिना सुरु झाल्यानंतर या दिवसात शेतात फारशी कामे राहत नाहीत. खरीपाच्या हंगामासाठी साधारणपणे अक्षय तृतीयेनंतर मशागतीची कामे सुरु होता. माहेरवाशिन झोका व गौराई गीत म्हणून अक्षय आनंद घेत असतांना खान्देशात या दिवशी गल्लोगल्ली जुगाराचे अड्डे बसलेले असतात. पाच रुपयांपासून ते पाच हजारापर्यंतचा डाव या दिवशी खेळला जात असतो.तीन पत्ती, फटका, झन्ना-मन्नावर कोट्यवधीची उलाढालअक्षय तृतीयेला तीन ते चार दिवस शिल्लक असताना ग्रामीण भागात जुगार अड्डे सुरु होतात. या दिवशी सर्वात जास्त प्रमाणात तीन पत्ती आणि फटका या प्रकाराला प्राधान्य दिले जाते. झटपट श्रीमंत आणि कंगाल करणाºया या दोन्ही खेळ प्रकारात खान्देशात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.जुगाराला मिळते या दिवशी प्रतिष्ठाअक्षय तृतीयेच्या दिवशी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मंडप टाकून जुगार अड्डे चालविण्यात येत असतात. जुगार अड्डा चालविणारा जागा मालक हा खेळात सहभागी लोकांसाठी जेवणापासून ते दारू, गुटखा, सिगारेट, चहा यासाºयाची व्यवस्था जागेवरच करीत असतो. एरव्ही बदनाम असलेल्या जुगाराला अक्षय तृतीयेच्या दिवशी मात्र प्रतिष्ठा मिळत असते. जुगार खेळण्यात रमलेले अनेक जण हे तीन ते चार दिवस एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेले असतात.रावाचा रंक आणि रंकाचा रावबेभरवशाचा खेळ असलेल्या जुगारात अनेक जण या दिवशी रावाचे रंक होत असतात. तर अनेक जण रंकाचे राव देखील होत असतात. जुगारात पैसे जिंकल्यानंतर मात्र हारणाºया व्यक्तींकडून त्याला पूर्ण डाव होईपर्यंत खेळण्यासाठी आग्रह होत असतो. जास्तीच्या मोहात अनेकदा घरातील रोख रकमेसह सोने व चांदीचे दागिने तसेच मालमत्ता देखील गहाण ठेवण्याची नामुष्की अनेकांवर ओढवत असते.प्रथा म्हणून पोलिसांचे दुर्लक्षवर्षानुवर्षे चालत असलेली ही जुगाराची प्रथा म्हणून पोलीस प्रशासन देखील कारवाई न करता या दिवशी या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असते. तर काही ठिकाणी जुगार अड्डा चालविण्यासाठी मालकाकडून पोलिसांना मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जात असतो. एखाद्या कारवाईत शासकीय नोकरदार किंवा राजकीय मंडळ मिळाल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी लाखो रुपयांची वरकमाई पोलिसांना सहज यानिमित्ताने होत असते.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव