‘जीएसटी’मुळे व्यापा:यांकडून ब्रॅण्डेड डाळींची विक्री बंद

By Admin | Updated: July 4, 2017 11:21 IST2017-07-04T11:21:28+5:302017-07-04T11:21:28+5:30

ब्रॅण्डेड कपडय़ांच्या दरात वाढ : औषधी, डाळींचे दर स्थिर

Trading through GST: Branded pulses are discontinued | ‘जीएसटी’मुळे व्यापा:यांकडून ब्रॅण्डेड डाळींची विक्री बंद

‘जीएसटी’मुळे व्यापा:यांकडून ब्रॅण्डेड डाळींची विक्री बंद

 ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि.4 - वस्तू व सेवाकर कायदा लागू झाल्यानंतर सोमवारी ब्रॅण्डेड कपडय़ांच्या दरात वाढ झाली. औषधी, हॉटेलमधील जेवण, धान्याच्या दरात कोणतीही वाढ  झालेली नाही. दरम्यान ब्रॅण्डेड डाळींची विक्री प्रणालीअभावी थांबविण्यात आली आहे. 1 जुलैच्या तुलनेत दाणाबाजारातील उलाढाल वाढली आहे. काही व्यापा:यांनी अद्यापही जीएसटीच्या सॉफ्टवेअर प्रणाली सुरू केलेली नाही.
वस्तू व सेवा कराबाबत व्यापारी व ग्राहकांमध्येदेखील संभ्रम कायम आहे. अनेक वस्तूंचे दर वाढल्याचा भीतीने ग्राहकांनी इलेक्ट्रॉनिक दुकानांसह  व धान्य बाजाराकडे पाठ फिरविली आहे. ज्या वस्तूंवर कर लावण्यात आला आहे. अशा वस्तूंचे नवे दर अद्याप  प्राप्त झाले नसल्याने सोमवारी कोणत्याही वस्तूचे दर वाढलेले नव्हते. 
डाळ उद्योगातील अनेक व्यापा:यांनी अद्याप जीएसटीची सॉफ्टवेअर प्रणाली  सुरू केली नसल्याने विक्री बंद केली आहे. यामुळेच दाणाबाजारातील उलाढाल कमी आहे. सोमवारी अनेक व्यापा:यांकडून सॉफ्टवेअर प्रणाली सुरू करण्याचे काम सुरू होते. 1 जुलै रोजी 10 टक्केच उलाढाल बाजारात झाली होती. सोमवारी  मात्र उलाढाल वाढली होती. ब्रॅण्डेड डाळींवर जीएसटी लागू झाली असली तरी डाळींचे दर निश्चित करण्यात आलेले नाहीत. यामुळे व्यापा:यांकडून ब्रॅण्डेड डाळींची विक्री थांबविण्यात आली आहे. दोन दिवसात नवे दर लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे ब्रॅण्डेड डाळींचे दर 5 टक्क्यांनी वाढणार आहेत. 
विमा हप्त्याचे दर वाढले
वस्तू व सेवाकर लागू झाल्यानंतर विमा काढलेल्यांना हप्तादेखील  वाढला आहे. टर्म पॉलिसीसाठी आधी 15 टक्के कर आकारण्यात येत होता. 

Web Title: Trading through GST: Branded pulses are discontinued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.