आज व्यापाऱ्यांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:22 IST2021-02-26T04:22:11+5:302021-02-26T04:22:11+5:30

जळगाव : केंद्र सरकारने लागू केलेल्या वस्तू व सेवा करातील (जीएसटी) जाचक अटी, तरतुदी व किचकट संगणक प्रणालीला अशा ...

Traders closed today | आज व्यापाऱ्यांचा बंद

आज व्यापाऱ्यांचा बंद

जळगाव : केंद्र सरकारने लागू केलेल्या वस्तू व सेवा करातील (जीएसटी) जाचक अटी, तरतुदी व किचकट संगणक प्रणालीला अशा जाचक अटीच्या विरोधात शुक्रवार, २६ फेब्रुवारी रोजी कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने देशात एक दिवसाचा भारत व्यापार बंद पुकारला आहे. यात जळगावातील व्यापारीही सहभागी होणार असल्याचे कॅट संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.

जीएसटी कायद्यातील वारंवार होणारे बदल थांबवावेत, जीएसटी परताव्यात सुधारणा करण्याची अनुमती द्यावी, सतत बदलांच्या अध्यादेशाचा मारा थांबवावा, नोंदणी रद्द करण्याची किंवा प्रतिबंधित करण्याचे अधिकारांचे उल्लंघन थांबवावे, जर पुरवठादाराने जीएसटी भरला नाही तर त्याची जबाबदारी खरेदीदारावर टाकली जात आहे ही तरतुद बदलावी, अनावश्यक विलंब शुल्क आकारने थांबवावे, जीएसटीमधील 'एचएसएन' इ-वे बिल, इनपुट टॅक्स क्रेडिट, कॅश लेजर, क्रेडिट लेजर, अव्हेलेबल, युटीलाईज्ड क्रेडिट सेवा अशा अनेक बाबींना व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्या सुलभ कराव्यात, याशिवाय व्यापाऱ्यांकडे बघण्याचा चुकीचा दृष्टीकोन सरकारने बदलावा, अशा अनेक मागण्या व्यापाऱ्यांच्या आहेत. त्या मान्य होत नसल्याने या विरोधात हा बंद पुकारण्यात आला असून यात सहभागाचे आवाहन कॅटच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Traders closed today