वाळू वाहून नेणा-या ट्रक्टरची ट्रॉली पलटी होऊन जळगाव जिल्ह्यात तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 23:10 IST2017-12-09T23:04:12+5:302017-12-09T23:10:13+5:30
वाळू घेऊन जाणा-या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा हूक तुटल्याने ट्राली पलटी झाली, त्यात दबला गेल्याने नितीन इंदल परदेशी (वय ३४, रा.राणीचे बांबरुड, ता.पाचोरा) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी बाबंरुड गावाजवळ घडली.

वाळू वाहून नेणा-या ट्रक्टरची ट्रॉली पलटी होऊन जळगाव जिल्ह्यात तरुण ठार
ठळक मुद्देमयत राणीचे बांबरुड गावाचा रहिवाशीट्रॉलीचा हुक तुटल्याने झाला अपघातदुपारी झाला अपघात
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,९: वाळू घेऊन जाणा-या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा हूक तुटल्याने ट्राली पलटी झाली, त्यात दबला गेल्याने नितीन इंदल परदेशी (वय ३४, रा.राणीचे बांबरुड, ता.पाचोरा) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी बाबंरुड गावाजवळ घडली. नितीन याचा मृतदेह सायंकाळी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नितीन याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.