ट्रॅक्टर पलटी होवून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 13:13 IST2019-01-10T13:12:59+5:302019-01-10T13:13:37+5:30

अवैध वाळू घ्यायला गेले असतानाची घटना

 Tractor fluctuating and death of one | ट्रॅक्टर पलटी होवून एकाचा मृत्यू

ट्रॅक्टर पलटी होवून एकाचा मृत्यू

ठळक मुद्देगिरणा नदी पात्रात तीन तास पडून होता मृतदेह

जळगाव : अवैध वाळू घ्यायला गेलेले ट्रॅक्टर पलटी होऊन काशिनाथ रामकृष्ण अस्वार (बारी) (वय ३५, रा.शिरसोली प्र.न.ता.जळगाव ह.मु.हरिविठ्ठल नगर, जळगाव) या चालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे तीन वाजता आर्यन पार्कला लागून असलेल्या वैजनाथ येथील गिरणा नदीपात्रात घडली. काशिनाथ याचा मृतदेह तब्बल तीन तास ट्रॅक्टरखाली होता.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, काशिनाथ अस्वार हा तरुण गुरुवारी पहाटे तीन वाजता ट्रॅक्टर (क्र.एम.एच.१९ ए.पी.६८८६) घेऊन वैजनाथ येथील गिरणा नदीपात्रात वाळू घ्यायला गेला होता. त्याच्यासोबत आणखी दोन ते तीन तरुण मजुर होते. नदीपात्रात अरुंद रस्ता व किनार असल्याने नियंत्रण मिळविता न आल्याने ट्रॅक्टर ट्रालीसह किनाऱ्यावरुन पलटी झाले. त्यात काशिनाथ दबला गेला तर अन्य तरुण बालंबाल बचावले. छाती व पोटावर ट्रॅक्टचे वजन पडल्याने काशिनाथ याचा जागीच मृत्यू झाला.
लहान क्रेन आणून काढला मृतदेह बाहेर
ट्रॅक्टर पलटी होऊन चालक ठार झाल्याची माहिती समाधान धनगर या तरुणाने तालुका पोलिसांना पहाटे साडे चार वाजता कळविली. त्यानुसार हेडकॉन्स्टेबल मगन मराठे, अरुण सोनार, रमेश जाधव व राजेंद्र बोरसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ट्रॅक्टरखाली असल्याने बाहेर काढता येत नव्हता, त्यामुळे पोलिसांनी लहान क्रेन मागवून पहाटे सात वाजता ट्रॅक्टर उचकवून मृतदेह बाहेर काढला. ट्रॅक्टर काढणे शक्य झाले नाही. पोलिसांनी तेथून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.

Web Title:  Tractor fluctuating and death of one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.