विविहितेचा छळ- १० जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:23 IST2019-07-02T21:23:03+5:302019-07-02T21:23:07+5:30

पारोळा : फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणावेत, असे म्हणून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. या प्रकरणी दहा ...

Torture of Diversity - 10 offenders | विविहितेचा छळ- १० जणांवर गुन्हा

विविहितेचा छळ- १० जणांवर गुन्हा



पारोळा : फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणावेत, असे म्हणून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. या प्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा येथील डी.डी.नगर माहेर व पुणे येथील सासर असलेली विवाहिता गौरी अक्षय अभोनेकर हिने माहेरहून फ्लॅट घेण्यासाठी ५० लाख रुपये आणावेत, यासाठी सासरची मंडळी अक्षय सुनील अभोनेकर, सुनील सोमनाथ अभोनेकर, जयश्री सुनील अभोनेकर, अनुजा सुनील अभोनेकर, उषा सोमनाथ अभोनेकर, दिनेश सोमनाथ अभोनेकर, उमेश सोमनाथ अभोनेकर (सर्व रा.पुणे), सुलक्षणा दिनेश अभोनेकर, नीता उमेश अभोनेकर, प्रमिला जयवंत सोनवण (सर्व रा.नाशिक) यांनी विवाहितेला २७ आॅक्टोबर १८ ते २५ एप्रिल १९ यादरम्यान सासरच्या मंडळीने तिचा शारीरिक मानसिक छळ केला. यामुळे गौरी अक्षय अभोनेकर हिच्या फिर्यादीवरून सदर आरोपींविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.हे.कॉ. विनोद साळी करीत आहेत.

Web Title: Torture of Diversity - 10 offenders