उद्या डॉ. अतुल साळुंखे यांचे व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:12 IST2021-05-28T04:12:56+5:302021-05-28T04:12:56+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि झेड. बी. पाटील महाविद्यालय, धुळे येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग ...

Tomorrow Dr. Lecture by Atul Salunkhe | उद्या डॉ. अतुल साळुंखे यांचे व्याख्यान

उद्या डॉ. अतुल साळुंखे यांचे व्याख्यान

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि झेड. बी. पाटील महाविद्यालय, धुळे येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २९ मे, २०२१ रोजी कर्मवीर व्यंकटराव रणधीर व्याख्यानमाले अंतर्गत प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांचे ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्‍यात आले आहे.

रा.से.यो.चे माजी राज्य संपर्क अधिकारी राहिलेले डॉ. साळुंके हे समाज प्रबोधन या विषयावर बोलणार असून, यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील अध्यक्ष राहतील. शनिवारी सायंकाळी ६ वाजता ऑनलाइन व्याख्यान होईल. यावेळी किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूरचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, झेड. बी. पाटील महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सुधीर पाटील, रासेयोचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांची ऑनलाइन प्रमुख उपस्थिती असेल.

Web Title: Tomorrow Dr. Lecture by Atul Salunkhe