अवैध वृक्षतोडप्रकरणी लाकूड व्यावसायिकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST2021-06-04T04:14:13+5:302021-06-04T04:14:13+5:30
तालुक्यातील गिरडगाव ग्रामपंचायतीच्या मालकीच्या शेतातील पाझर तलावावरील १० एप्रिल २०२० रोजी किनगाव येथील लाकूड व्यावसायिक संशयित सद्दाम ...

अवैध वृक्षतोडप्रकरणी लाकूड व्यावसायिकास अटक
तालुक्यातील गिरडगाव ग्रामपंचायतीच्या मालकीच्या शेतातील पाझर तलावावरील १० एप्रिल २०२० रोजी किनगाव येथील लाकूड व्यावसायिक संशयित सद्दाम शहा खलीलशहा व १२ जणांनी ८० हजार रुपये किमतीचे कडूनिमसह बाभूूळ, पळस, हिवर, करंज अशा एकूण ६६ डेरेदार वृक्षांची मशीन, कुऱ्हाड, करवतीच्या साह्याने कत्तल केली होती. लाल रंगाच्या ट्रॅक्टरने वाहतूक करून चोरून नेले होते. याप्रकरणी गिरडगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच अलकाबाई मधुकर पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला १३ एप्रिल २०२० रोजी चोरीचा संशयित आरोपी सद्दाम शहा खलील शहा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. बुधवारी रात्री फौजदार जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, हे. कॉ. असलम खान, पो. कॉ. सुशील घुगे, नीलेश वाघ, रोहील गणेश या पथकाने संशयितास किनगाव येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे.