शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

शेतकरी जीवनातील उत्सव तिफन नांदवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 2:57 PM

‘गाव पांढरी’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक रवींद्र पांढरे...

तिफन भरणे हे जसे कौशल्याचे काम तसेच तिफनवर पेरणी करणे हेसुद्धा कौशल्याचेच काम. तिफन हाकताना दोन तासांमधील अंतर वाढणार नाही (म्हणजे फट पडणार नाही) किंवा दोन तासांमधील अंतर कमी होणार नाही. (म्हणजे दोन तास मिळणर नाही) याची काळजी घ्यावी लागते. फट पडल्यास वा दोन तास मिळाल्यास आंतर मशागत नीट करता येत नाही. म्हणून तिफन हाकण्याचं कौशल्य अवगत असणाऱ्या कमीच असतं. सर्वच शेतकरी, शेतमजुरांना तिफन हाकण्याचं कौशल्य अवगत नसे. त्यामुळे ज्यांना हे कौशल्य अवगत आहे त्यांचा पेरणीच्या काळात भाव वधारलेला असे. इतर मजुरांच्या तुलनेत त्यांना दीड दोनपट मजुरी मिळायची.मी नांगरणी, वखरणी तर यांत्रिक पद्धतीने होतेच पण आताशा पेरणीसुद्धा यांत्रिक पद्धतीने व्हायला लागली आहे. पूर्वी पेरणी व्हायची ती तिफनवरच. कपाशी पेरायची तर मोघ्यावर आणि ज्वारी पेरायची तर चाड्यावर ‘तिफन’ म्हटलं तर एक शेती अवजार. पण तिफनविषयी किती पवित्र भावना, कृतज्ञ श्रद्धा असायची शेतकºयाच्या मनात. पेरणी करण्यासाठी तिफन शेतात न्यावयाची तर तिला आधी सुताराकडून नांदवून आणत असतं. तिफन नांदवणे हा पेरणीला सुरूवात करायाच्या वेळचा शेतकºयांच्या जीवनातील एक उत्सवी सोहळा. मुळात पेरणी हाच एक उत्सव होता. त्यात तिफन नांदवण्याच्या पवित्र, कृतज्ञ भावनेची भर. पेरणीला सुरुवात करावयाची तर जमिनीत पुरेसी ओल झाल्याशिवाय पेरणी करत नसत. धुळ पेरणी असा काही प्रकार नव्हताच रात्री पुरेसा पाऊस पडून गेलेला. पहाटेच्या वेळी ही आभाळ भरून आलेलं. सर्वदूर आभाळाची आश्वासक वत्सला सावली. वातावरणात सुखावणारा सुखद गारवा. चित्तवृत्ती उल्हासित, प्रसन्न करणारं आल्हाददायक पावसाळी वातावरणं. पेरणीला सुरुवात व्हायची ती बहुधा अशा वातावरणात.अशा वातावरणातच शेतात पेरणीला सुरुवात करण्याआधी तिफन सुताराकडे नांदवायाला नेत असत. सोबत तिफनची पूजा करायला पुजेचं ताट. त्यात हळद, कुंकू, फुलं, दिवा, प्रसादासाठी गूळ असे. तिफनला नैवैद्य ही दाखवत असत दहीभाताचा. सुरुवातीला सुतार आपल्या गणिती नजरेनं न्याहाळून, दोरी लावून तिफन गुण्यात आहे की नाही याच अवलोकन करायचा. अभियांत्रिकी दृष्टीत ती. समजा तिफन गुण्यात नसेल तर तिला गुण्यात लावून द्यायचा.ही एक कौशल्याची कारागिरी. गुण्यात तिफन भरणारे तज्ज्ञ सुतार तुलनेने कमीच असत. त्याबाबतीच आमच्या गावच्या शंभु सुताराचा ‘तिफन भरावी तर शंभु मिस्तरीनच’ असा लौकिक होता.तिफन हाकणं हे जसं कौशल्याच काम तसच चाड्यावर पेरणी करण हे सुद्धा कौशल्याचेच काम. चाड्यावर बियाणं भरली मुड अशी चाळवयाची की, तिफनच्या तीन ही तासात सारखच बियाण पडलं पाहिजे. एखादं तास दाट तर एखाद विरळ असे होता कमा नये. त्यामुळे ही पेरणीची मूठ चाळवण हेदेखील कौशल्याच. चाड्यावर पेरणी करणाºया बायाही मोजक्याच असत. त्यांना ही तुलनेने जास्तच मजुरी मिळायची. त्यामुळेच पेरणीची मूठ हा विशिष्ट वाक्प्रचार अस्तित्वात आला आहे. पेरणीची मूठला बाणीची मूठ असा लक्षणार्थ प्राप्त झाला आहे. नाही तरी शेतकरी म्हणतातच ‘मढ झाकून ठेवा पण पेरणीची वेळ साधा’ यावरून कृषीजल जीवनात पेरणी या कृषी कार्याला किती महत्त्व होतं याची जाणीव होेते.आता ट्रॅक्टरवर पेरणी करतात. पेरणीसाठी ट्रॅक्टर शेतात नेताना ट्रॅक्टरला तिफन सारख नांदवताना मी तरी अजून पाहिल नाही. पाऊस पाण्याचा भरवसा नाही.म्हणून धूळ पेरणी असा एक पेरणीचा प्रकार आता अनुभवाला येतो.ना खाली जमिनीत ओल, ना वरती आभाळाची वत्सल सावली. रणरणत्या उन्हात घाम पुसतच बियाण धुळीच्या हवाली करायचं. पेरणी हे आता उरलं आहे ते केवळ एक कृषीकर्म, त्यातल पावित्र्य, आत्मियता पार आटून गेलीयं. पेरणीच्या बाबतीत हळवी असणारी मनं आता पार बोथट झाली हेत. यांत्रिकतेमुळे कृषीकर्मातील भावोत्कटता पार हरवून गेलीच हेच खरे.-रवींद्र पांढरे, पहूर पेठ, ता.जामनेर, जि.जळगा

टॅग्स :literatureसाहित्यJamnerजामनेर