जामनेरजवळ बंधा:यात बुडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 19:38 IST2017-09-10T19:34:59+5:302017-09-10T19:38:07+5:30
मित्रांसोबत पोहायला गेला असताना झाला घात

जामनेरजवळ बंधा:यात बुडून युवकाचा मृत्यू
ऑनलाईन लोकमत
जामनेर,दि.10 - शहराजवळील बोदवड पुलाला लागून असलेल्या कांग नदीच्या बंधा:यात पोहायला गेलेल्या शेख वसीम शेख असलम (वय 19) या युवकाचा रविवारी दुपारी दोन वाजता दुर्दैवी मृत्यू झाला.
मयत युवक हा मलीक नगरातील रहिवासी आहे. कांग नदी पात्रातील या बंधा:याजवळ मोठय़ा प्रमाणात पाणी साठलेले आहे. रविवारी वसीम त्याच्या तीन मित्रांसह 12 वाजेच्या सुमारास पोहायला गेला. चौघे पोहत असताना इतर तिघे पाण्यातून बाहेर आले, मात्र त्यांना वसीम बाहेर आला नाही. पाण्यात शोध घेत वसीमला बाहेर काढले. तत्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिका:यांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वसीमचे नातेवाईक व समाजबांधवांनी रुग्णालयात गर्दी केली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयात जावून वसीमच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. वसीम हा गरीब कुटुंबातील असून त्याचे वडील मजुरी करतात तर आई भंगार वेचण्याचे काम करते. त्याला एक लहान भाऊ व बहीण आहे.