शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

मेहरूणमधील पक्ष्यांच्या अधिवासाला ओहोटी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 12:34 IST

पक्षीप्रेमी निराश : नैसर्गिक बेट झाली उध्वस्त, अन्नसाखळी तुटली

जळगाव : काही वर्षांपूर्वी महापालिकेने मेहरूण तलावाची खोदाई करताना नैसर्गिकपणे तयार झालेली बेटेही उध्वस्त केल्याने आणि मानवी वावर वाढून अन्नसाखळीही तुटू लागल्याने मेहरूण तलावात विविध देशी विदेशी पक्ष्यांचा असलेला चिवचिवाट आता क्षीण झाला आहे.मेहरूण तलाव हे स्थानिकांबरोबरच आता पर्यटकांचेही आवडीचे ठिकाण बनले आहे. एवढेच नव्हे तर जॉगिंगसाठी, निसर्गप्रेमी तसेच पक्षीप्रेमींसाठीही एकेकाळी मेहरूण साद घालत होता. मात्र आता हे जुने चित्र आणखीन जुने झाले आहे. याठिकाणी वाढणारा मानवी वावर, प्रदूषण यामुळे अन्नसाखळीही विस्कळीत झाल्याने येथे पाण्यात मनसोक्त विहार करणाऱ्या तसेच बेटांवर मनसोक्त विश्रांती घेणाºया पक्ष्यांचे चित्र दुर्मिळ झाले आहे.काही वर्षांपूर्वी मेहरूणमधील गाळाचा उपसा करण्यात आला होता. त्यावेळी या तलावात असलेली नैसर्गिक बेटे ज्यावर पक्षी विश्रांती घेत असत, तीच उध्वस्त करण्यात आली. मानवी वावर वाढल्यामुळे मेहरूणच्या काठी असलेल्या झाडांच्या मुळाशी असणारे कीटक, छोटे खडे हे पक्ष्यांचे मुख्य खाद्यही बंद झाले आहे. त्यामुळे येथे पक्षांचे दर्शन दुर्मिळ झाले आहे.मेहरूण तलावात देशींबरोबरच विदेशी पक्ष्यांचाही पूर्वी वावर होता. याठिकाणी येणारे पक्षी हे बहुतांशी उत्तर धु्रवावरील असतात. या पक्ष्यांची मेहरूणला जास्त करून पसंती असायची.कारण मेहरूणमधील बेटांवर विविध पक्ष्यांचे थवेच्या थवे बसलेले असायचे. पक्षीप्रेमींसाठी ही एक आनंददायी पर्वणी होती. पण मेहरूणला दिसणाºया या पक्षीवैभवाला आता ओहोटी लागली आहे.का होते उत्तर धुव्रावरील पक्ष्यांचे स्थलांतर.?उत्तर धु्रवावर काही काळ बर्फाचा वर्षाव होतो. त्यामुळे त्याठिकाणी पक्ष्यांना खाद्य मिळणे मुश्किल होते. त्यामुळे हे पक्षी संमिश्र वा उष्ण वातावरणातील प्रदेशाकडे स्थलांतरित होतात.या पक्ष्यांचाही होता वावर..मेहरूण तलावाच्या ठिकाणी पूर्वी शराटी, धनवर, प्लवर, सरीता, टिटवी, मोठे बगळे, पान कावळे, ठिपकेवाला, तुतारी, पांधरा, धोबी, वयक, कुरी अशा दुर्मिळ पक्ष्यांचे आगमन होत होते. मात्र सध्या या पक्ष्यांचे दर्शनही दुर्मिळ झाले आहे.मराठी प्रतिष्ठानतर्फे मेहरूण तलावाच्या ठिकाणी पक्ष्यांचा वावर पुन्हा निर्माण करण्यासाठी येथे बेट निर्माण करणे, पक्ष्यांना लागणारे खडे, कीटक निर्माण होतील, अशी परिस्थिती निर्माण करणे, याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेला प्रस्ताव देण्याचा विचार आहे.-विजय वाणी, उपाध्यक्ष, मराठी प्रतिष्ठान

टॅग्स :riverनदीJalgaonजळगाव