शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

टिकटॉक व्हिडिओ बेतला जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 14:36 IST

तरूणाचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू : जिवंत असल्याच्या आशेवर रुग्णालयात फिरफिर

जळगाव : मेहरूण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सुप्रिम कॉलनीतील तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्र्देवी घटना रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली़ पांडुरंग मारूती अठारे (२६) असे मृत तरूणाचे नाव आहे़ टिकटॉक व्हिडिओ बनविण्याच्या नादात त्याचा पाण्यात पाय घसरला आणि त्यातच त्याचा करुण अंत झाला. दरम्यान, तो जिवंत आहे या आशेवर नातेवाईकांनी तीन खासगी रूग्णालयात फिरविले. फिरून नंतर मृतदेह घरी नेण्यात आला. रात्री पावणे आठ वाजता पोलिसांना पुन्हा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला़पांडुरंग अठारे हा तरूण कुटुंबियांसह सुप्रिम कॉलनीत गेल्या तीन ते चार वर्षांपासून वास्तव्यास होता़ तो मालवाहू वाहनावर चालक होता़ रविवारी त्याचे मेव्हणे व त्यांचे भाऊ तसेच दोन ते तीन जण मेहरूण तलावात पोहण्यासाठी गेला होता़ मेव्हण्यांना पोहता येत असल्याने ते दूर निघून गेले होते़ इकडे टिक- टॉक व्हिडिओ बनवित असताना अचानक त्याचा पाय घसरला व त्याच्या नाका तोंडात पाणी गेले बाकीच्या मित्रांनी आरडा- ओरड केली़ नंंतर त्याला बाहेर काढण्यात आले़दरम्यान, तो दोन वेळेस पाण्यात पोहण्यासाठी उतरला होता मात्र तिसऱ्या वेळेत उतरल्यानंतर खड्ड्यात अडकल्याने तो बुडाल्याचेही सांगण्यात आले़ त्याचे मेव्हणे जवळ पोहत असते तर कदाचित त्याला लवकर बाहेर काढता आले असते, असेही काहींनी सांगितले़ त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ किरण, बहीण अर्चना असा परिवार आहे़ किरण याचे चहाचे दुकान आहे.पाण्यातून बाहेर काढल्याचाही व्हिडिओ व्हायरलपांडुरंग याला पाण्यातून बाहेर काढल्यानंतरचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे़ शिवाय पांडुरंग याला उचलून नेत असल्याचेही यात दिसत आहे़सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणीमेहरूण तलावात रोज युवकांचा काहीना काही कारणास्तव बुडून मृत्यू होत असून या ठिकाणी त्वरित जीवरक्षक व सुरक्षा रक्षक नेमावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्ध प्रमुख सलिम इनामदार यांनी केली आहे़ याबाबत लवकरच आयुक्तांना भेटून राष्ट्रवादीतर्फे मागणी मांडणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे़ महापालिकेने सुरक्षा व्यवस्था केल्याास तरूणांचे प्राण वाचतील असे त्यांनी म्हटले आहे़मृतदेह घरी आणून पुन्हा रूग्णालयात हलविलापांडुरंग याला बाहेर काढल्यानंतर मित्रांनी त्याला जिल्हा रूग्णालयात हलविले. या ठिकाणी तपासणी केल्यानंतर श्वासोच्छवास सुरू असल्याचे लक्षात आले. तिथून त्याला तत्काळ खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. त्या ठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले. पुन्हा त्याला दुसºया रूग्णालयात हलविले मात्र त्या ठिकाणीही मृत घोषित केल्यानंतर मृतदेह घरी नेण्यात आला़ पोटावर हात पडल्याने त्याला उलटी झाल्यानंतर तो जिवंत असल्याचा समज झाला आणि नातेवाईकांनी पुन्हा खासगी रूग्णालय गाठले़ मात्र डॉक्टरांनी वाहनातच तपासणी करून मृत घोषित केले़ त्यानंतर मृतदेह घरी आणण्यात आला़दोन दिवसात तीन मृत्यूमेहरूण तलावात यंदा पाण्याची पातळी वाढली आहे़ या तलावात अनेक ठिकाणी न समजणारे जीवघेणे खड्डे आहेत़ याच तलावात दोन भावांचा मृत्यू झाला होता़ या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच एका तरूणाचा मृत्यू झाला़शनिवारीच केली नवी मालवाहू गाडी बूकपांडुरंगकडे एक मालवाहू व एक चारचाकी गाडी होती़ त्याने शनिवारीच एक मालवाहू गाडी बुक केली होती़ ती गाडी गणेशोत्सवात घरी आणण्याचे त्याचे प्रयोजन होते़पोलिसांची समजूत...पांडुरंगचा मृतदेह थेट घरी आणल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, सतीश गर्जे, अतुल पाटील यांनी पांडुरंगच्या घरी जात मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यास सांगितले. मात्र, नातेवाईकांनी शवविच्छेदनासाठी नकार दिला, घरून मृतदेह घेऊन जाऊ नका, असे नातेवाईकांचे म्हणणे होते, मात्र, पोलिसांनी नातेवाईकांनी समजूत घालत अखेर मालवाहू गाडीत रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला़ तलावाच्या काठावर बसून तो व्हीडीओ तयार करीत होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव