चाकूचा धाक दाखवून कृषी महाविद्यालयाच्या विद्याथ्र्याला लुटले
By Admin | Updated: September 27, 2015 00:04 IST2015-09-27T00:04:37+5:302015-09-27T00:04:37+5:30
कृषी महाविद्यालयाच्या विद्याथ्र्याला दोन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना शुक्रवारी सकाळी 7.45 वाजता पारोळा रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडली.

चाकूचा धाक दाखवून कृषी महाविद्यालयाच्या विद्याथ्र्याला लुटले
धुळे : कृषी महाविद्यालयाच्या विद्याथ्र्याला दोन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना शुक्रवारी सकाळी 7.45 वाजता पारोळा रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडली. विशेष म्हणजे लुटारू तरुणांनी शहरात पायी चालत येणा:या या विद्याथ्र्याला दुचाकीवर बसवून बाजार समितीच्या आवारात आणल्यानंतर लुटले. सोलापूर जिल्ह्यातील वाफळे येथील आण्णा भारत वाघमारे (20) हा कृषी महाविद्यालयात शिकत असून तो महाविद्यालयाच्या वसतिगृहात रहातो. तो महाविद्यालयाकडून शहरात पायी जात होता. रस्त्यावरील डॉ.राजेश पाटील यांच्या रुग्णालयाजवळ (एमएच 18 एई 7015) क्रमांकाच्या दुचाकीवरून दोन तरुण आले. त्यांनी त्याला दुचाकीवर बसवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असणा:या डाक कार्यालयाजवळ आणले. तेथे आण्णा वाघमारेला दोघांनी शिवीगाळ, मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून सात हजारांचा मोबाइल, 1 हजार रुपये रोख असा मुद्देमाल लुटून दोघांनी पलायन केले. या प्रकारानंतर आण्णा वाघमारे याने आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून अज्ञात तरुणांवर भादंवि कलम 394, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी.एस. ढोले करीत आहेत.