वन अधिकार्यांवर दगड फेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:46 IST2020-12-04T04:46:53+5:302020-12-04T04:46:53+5:30
बोदवड जि. जळगाव : तालुक्यातील वनहद्दीत झोपड्यांचे अतिक्रमण तसेच तारेच्या कुंपणाबाबत जाब विचारणार्या अधिकार्यावर दगडफेक करण्यात आली. यात ...

वन अधिकार्यांवर दगड फेक
बोदवड जि. जळगाव : तालुक्यातील वनहद्दीत झोपड्यांचे अतिक्रमण तसेच तारेच्या कुंपणाबाबत जाब विचारणार्या
अधिकार्यावर दगडफेक करण्यात आली. यात कुणालाही इजा झाली नाही.यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाा आहे. गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
मुक्ताईनगर वन परिक्षेत्र अधिकारी आशुतोष रमेश बच्छाव हे पथकासह गस्तीवर असताना, या हद्दीत काही ठिकाणी झोपड्यांचे अतिक्रमण तसेच तारेचे कुंपण केलेले आढळले व याबाबत विचारणा केली असता त्यांच्यावर दगडफेक झाली. झोपडीत असलेल्या उत्तम भिल याने शेजारील झोपड्यांमधील नागरिकांना फोन करून बोलवून घेतले व यातील काही महिला व नागरिकांनी वनअधिकाऱ्यास ‘ या पुढे इकडे आल्यास हातपाय तोडू’ अशी धमकी देत दगडफेक केली. यावेळी महिला अधिकारी दीपाली बेलदार यांनाही धक्काबुक्की झाली.