तीन वेगवेगळ्या घटनेत तीन तरुणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:13 IST2021-07-08T04:13:09+5:302021-07-08T04:13:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोदवड : तालुक्याला हादरवणाऱ्या तीन वेगवेगळ्या घटनेत तालुक्यात तीन तरुणांना बुधवारी आपला जीव गमवावा लागला ...

तीन वेगवेगळ्या घटनेत तीन तरुणांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
बोदवड : तालुक्याला हादरवणाऱ्या तीन वेगवेगळ्या घटनेत तालुक्यात तीन तरुणांना बुधवारी आपला जीव गमवावा लागला आहे.
तालुक्यातील नाडगाव येथे वीज वितरण कंपनीच्या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराचा मजूर बंटी प्रजापती (वय ३५, रा. मुखरा, भोपाल, मध्य प्रदेश) हा नाडगाव जवळील स्मशानभूमी जवळच्या वीज खांबावर पाईपाचे माप घेण्यासाठी वीज खांबावर चढला. त्याच्या हातातील लोखंडी पट्टीचा स्पर्श वीज तारेला झाल्याने त्याचा विजेचा धक्का लागला व तो २० फुटांवरून खाली जमिनीवर पडून जागीच मरण पावला.
दुसऱ्या घटनेत तालुक्यातील साळशिंगी येथील २५ वर्षीय तरुण योगेश जानकीराम भिल याने काहीतरी विषारी द्रव्य सेवन केले अथवा विषारी जनावराच्या चाव्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना मध्य रात्रीच्या सुमारास घडल्याने त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, शहरातील २५ वर्षीय तरुण राहुल बडगुजर उर्फ बबल्या रा. प्रभाग क्र. ५ याचा अहमदाबाद गुजरात राज्यात संशयास्पद मृत्यू झाला आहे. या तिन्ही घटनांनी तालुका हादरला असून तिन्ही तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.