यावलला एकाच रात्री तीन घरफोडय़ा
By Admin | Updated: April 13, 2017 13:23 IST2017-04-13T13:23:43+5:302017-04-13T13:23:43+5:30
यावल शहरातील विरार नगरात मध्यरात्री चोरटय़ांनी तीन ठिकाणी घरफोडय़ा करीत पोलिसांच्या गस्तीलाच आव्हान दिल़े

यावलला एकाच रात्री तीन घरफोडय़ा
नागरिकांमध्ये भीती : लाखोंचा ऐवज लंपास
जळगाव,दि.13- यावल शहरातील विरार नगरात मध्यरात्री चोरटय़ांनी तीन ठिकाणी घरफोडय़ा करीत पोलिसांच्या गस्तीलाच आव्हान दिल़े विशेष म्हणजे कुटुंब घरात झोपले असताना चोरटय़ांनी घरात प्रवेश केला़
शहरातील विरार नगरातील यासीन खान गफूर खान यांच्या घरातून 54 हजारांची रोकड तसेच सात हजार 600 रुपयांचा मोबाईल लांबवण्यात आला़ पाठीमागच्या खिडकीतून चोरटय़ांनी प्रवेश केला़
दुसरी घरफोडी अयूब रज्जाक तडवी यांच्या घरात झाली़ पाच हजार 500 रुपये रोख तसेच एक मोबाईल लांबवण्यात आला. तसेच बंगाली नामक इसमाच्या घरातून पाच हजारांची रोकड व मोबाईल चोरीस गेला़ यावल पोलिसांना घरफोडय़ांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेतली मात्र दुपार्पयत फिर्यादी पोलीस ठाण्यात न आल्याने गुन्हा दाखल झालेला नव्हता़