तीन हजार शेतकऱ्यांवर वादळाचा आघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:12 IST2021-06-22T04:12:14+5:302021-06-22T04:12:14+5:30
तालुक्यात १८ फेब्रुवारी २० मार्च, २१मार्च, २३ मार्च व १५ व १६ मे रोजी तौक्ते वादळ अतिवृष्टी, अवकाळी, ...

तीन हजार शेतकऱ्यांवर वादळाचा आघात
तालुक्यात १८ फेब्रुवारी २० मार्च, २१मार्च, २३ मार्च व १५ व १६ मे रोजी तौक्ते वादळ अतिवृष्टी, अवकाळी, वादळी पावसाने झोडपून काढले होते. या अवकाळीने शेतपिकांचे मोठे नुकसान केले झाले होते. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेला. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले. या अवकाळीत झालेली नुकसानभरपाई तत्काळ मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे; पण कोरोनाच्या संकटात ही मदत केव्हा मिळेल हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे.
असे झाले वादळ व पावसाने नुकसान
तालुक्यात २ हजार ९०८ शेतकऱ्यांचे ९२१.६६ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे.
ज्वारी, बाजरी, मका, कांदा, गहू, केळी, हरबरा, फळबाग, शेवगा, भाजीपाला, तीळ,एरंडी या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे अनेक अडचणींना सामोरा जाणारा शेतकरी वर्ग अधिकच अडचणीत आला आहे. संपूर्ण तालुक्यात या काळात मोठी अस्वस्थता होती. एकीकडे कोरोनाचा काळ, तर दुसरीकडे ही स्थिती होती.
या गावांना बसला फटका
बु., तरडी, देवगाव, वाघरे, जोगलखेडे, टेहू
हनुमंतखेडे, वाघरी, उंदिरखेडे, मोढाळे प्र.ऊ. उडणी दिगर, उडणी खालसा, बहादपूर, महाळपूर, इंधवे, जिराळी, भोलाणे, शिरसोदे, पिंपळभैरव, सुमठाणे, वडगाव प्र.अ., आंबापिंप्री, पुनगाव, शेवगे बु., भोकरबारी, बोदडे, वंजारी खु., कामतवाडी, मोरफळ, खोलसर, करमाड बु., रताळे, करमाड खु., बोळे, वसंतवाडी, ढोली, वेल्हाणेखु, पातरखेडे, तामसवाडी, टोळी, शेवगे प्र.ब. पिंप्रीप्र.ऊ, सोके, हिवरखेडा खु., मुंदाणे प्र.अ ही गावे बाधित क्षेत्रात आली आहेत. या ९२१ हेक्टरवर झालेली नुकसानभरपाई ही पीकनिहाय हेक्टरी कशी मदत शेतकऱ्यांना मिळणार ते शासन ठरविणार; पण ही नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी अशी अपेक्षा बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांचे पेरणीचे दिवस सुरू आहेत. यात बियाणे, रासायनिक खते, मजुरी यासाठी मोठी आर्थिक तरतूद करावी लागते. शासनाने ही नुकसानभरपाई तत्काळ द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात आली आहे.
तारीख व नुकसान क्षेत्र ( हेक्टरी) असे १८ फेब्रुवारी----२३४.६२, २० व २१ मार्च-- ३७१.१७, २३ मार्च----१७९.४२, १५ व १६ मे-- १३६.२५
नुकसानग्रस्त शेतकरी संख्या १८ फेब्रुवारी----७३३, २०व २१ मार्च-१०२३, २३ मार्च-------६७५, १५ व १६ मे---४७५