शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात दरोडा टाकण्यापूर्वीच तिघांना केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 16:24 IST

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच पैकी तीन चोरट्यांना पाठलाग करुन पकडण्यात आले असून दोन जण मात्र फरार होण्यात यशस्वी झाले.रावेर गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रावेर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. शेख नादर शेख कादर, शेख मुस्तफा शेख बिसमिल्ला व आकाश रामदास भालेराव (तिन्ही रा.रावेर) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. 

ठळक मुद्दे  दोन जण फरार होण्यात यशस्वी  एलसीबीची मध्यरात्री रावेरात कारवाईतिघं आरोपी वर्षभरासाठी हद्दपार

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,११ : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच पैकी तीन चोरट्यांना पाठलाग करुन पकडण्यात आले असून दोन जण मात्र फरार होण्यात यशस्वी झाले.रावेर गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रावेर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. शेख नादर शेख कादर, शेख मुस्तफा शेख बिसमिल्ला व आकाश रामदास भालेराव (तिन्ही रा.रावेर) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.       याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी हेडकॉन्स्टेबल रवींद्र गायकवाड, रमेश चौधरी, योगेश पाटील, गफूर तडवी व इद्रीस पठाण यांच्या पथकाला मंगळवारी रात्री रावेर तालुक्यातील विशेष तपासणी मोहीमेत पाठविले होते. रावेर पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेली पाच जणांची टोळी मध्यरात्री न्यायालय परिसरातील एक बगंल्यात दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना ही माहिती देऊन स्थानिक पोलिसांची मदत मागितली. कुराडे यांनी रावेरचे निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्याशी संपर्क साधून टोळीला पकडण्यासाठी पोलीस स्टेशनचे कर्मचारी पाठविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पिंगळे यांनी गजेंद्र पाटील, सुरेश मेंढे व जाकीर पिंजारी या तिघांना मदतीला दिले. तिघं वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपारअटकेतील शेख नादर, शेख मुस्तफा व आकाश भालेराव अशा तिघांवर रावेर पोलीस स्टेशनला चोरी, दरोडा, लुटमार, दरोड्याचा प्रयत्न अशा प्रकारचे तब्बल आठ गुन्हे दाखल आहेत. तसेच ६ आॅक्टोबर २०१७ रोजी पोलीस अधीक्षकांनी या तिघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे. जिल्ह्यात प्रवेश बंदी असतानाही त्यांच्याकडून दरोड्या प्रयत्न झाला. दरम्यान,दरोड्याचा प्रयत्न, पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन, हद्दपार कालावधीत जिल्ह्यात प्रवेश या तीन प्रकारे तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा