रामदेवनगरचे तिघे तिहेरी अपघातात ठार

By Admin | Updated: March 11, 2016 00:40 IST2016-03-11T00:40:36+5:302016-03-11T00:40:36+5:30

भरवाड कुटुंबावर काळाचा घाला

Three of Ramdevnagar killed in Triple accidents | रामदेवनगरचे तिघे तिहेरी अपघातात ठार

रामदेवनगरचे तिघे तिहेरी अपघातात ठार

 

 

तळोदा : उसाने भरलेल्या बैलगाडीस ओव्हरटेक करताना समोरून येणा:या ट्रकने जीपगाडीस जोरदार धडक दिली. यात तीन जण जागीच ठार झाले, तर आठ जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी सकाळी अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावर तालुक्यातील नळगव्हाण गावानजीक घडला. मयत भरवाड कुटुंब भाच्याच्या लगAासाठी सुरतजवळील गंगापूर येथे जात होते. त्याआधीच क्रूर काळाने त्यांच्यावर झडप घातली. मयतांमध्ये कुटुंबप्रमुख गबा करसन भरवाड (60), जडीबाई राघुभाई भरवाड ( 65), जीपचालक पांडुरंग ताराचंद चव्हाण (23) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये वाघा भवन भरवाड (40), पप्पू भिका भरवाड (15), पमू रणछोड भरवाड (40), मेहुल राजू भरवाड (वय नऊ), माऊ विमा भरवाड (25, सर्व रा. रामनगर), तसेच बैलगाडीतील गीता प्रकाश आवले (वय दीड वर्षे), गणेश प्रकाश आवले (वय तीन वर्षे), प्रकाश रामा आवले (35) रा. आंबाला, जि. औरंगाबाद यांचा समावेश आहे. जीपचा अक्षरश: चक्काचूर झाला असून बैलगाडीही 12 फूट दूर खड्डय़ात फेकली गेली. जखमींना तळोद्यात तर वाघा भरवाड यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. प्रकाशा येथे तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Three of Ramdevnagar killed in Triple accidents