शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला मदत करणारे तिनही पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 20:48 IST

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींसोबत प्रौढाला मारहाण केल्याच्या प्रकरणात अटक केलेला हवालदार मुकेश आनंदा पाटील, सुरेश श्रीराम सपकाळे व कॉ.गोरख हिंमतराव पाटील या तिघांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती खुद्द पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ ला दिली. पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयाने रविवारी तिघांची कारागृहात रवानगी केली.

ठळक मुद्देचिंग्याचे मारहाण प्रकरण गुन्ह्यात वाढीव कलम लावले

जळगाव : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींसोबत प्रौढाला मारहाण केल्याच्या प्रकरणात अटक केलेला हवालदार मुकेश आनंदा पाटील, सुरेश श्रीराम सपकाळे व कॉ.गोरख हिंमतराव पाटील या तिघांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती खुद्द पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ ला दिली. पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयाने रविवारी तिघांची कारागृहात रवानगी केली. मुकेश याचा गुन्ह्यात सक्रीय सहभाग होता तर सुरेश सपकाळे व गोरख पाटील हे चिंग्याला सोडून घरी निघून गेले. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका दोघांवर ठेवण्यात आला. दरम्यान, या तिनही निलंबित कर्मचाºयांना मुख्यालय पोलीस मुख्यालय देण्यात आले आहे.खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या चिंग्या उर्फ चेतन आळंदे याला या पोलिसांनी न्यायालयातून थेट कारागृहात न नेता त्याच्यासोबत खासगी कारने तुकारामवाडीत नेले होते. तेथे चिंग्याने अरुण भिमराव गोसावी यांना मारहाण करुन कारमध्ये डांबून ठेवले होते. या प्रकरणी चेतन आळंदे, गोलु उर्फ लखन दिलीप मराठे, हवालदार मुकेश पाटील, सुरेश सपकाळे व कॉ. गोरख पाटील यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.गुन्ह्यात कलम वाढविलेदरम्यान, या गुन्ह्यात आणखी ३६४ हे खून करण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचे कलम वाढविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिली.मद्यपी पोलिसाला सक्तीची सेवानिवृत्तीपोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या अशोक पटवारी या कर्मचाºयाला सोमवारी सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले. याबाबत पोलीस अधीक्षकांनी सायंकाळी आदेश जारी केले. यापूर्वी या कर्मचाºयाची विभागीय चौकशी सुरु होती. ड्युटीवर असताना सतत मद्यप्राशन करण्याच्या कारणावरुन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव