महामार्गाच्या दुरवस्थेने वाहन अपघातात तीन जण बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 19:41 IST2020-10-02T19:41:32+5:302020-10-02T19:41:39+5:30
महामार्गाच्या दुरवस्थेने कार व ट्रकचा अपघात होऊन त्यात तीन जण बालंबाल बचावले.

महामार्गाच्या दुरवस्थेने वाहन अपघातात तीन जण बचावले
वराड बुद्रूक, ता.धरणगाव : महामार्गाच्या दुरवस्थेने कार व ट्रकचा अपघात होऊन त्यात तीन जण बालंबाल बचावले. वराड ते पिंपळकोठा दरम्यान शुक्रवारी पहाटे ही घटना घडली.
महामार्ग क्रमांक सहाची दुरवस्था झाल्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. दोन्ही बाजूला दोन ते तीन फुटांचे खोल खड्डे झाल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे चित्र आहे.
शुक्रवारी पहाटे खड्ड्यांंचा अंदाज न आल्यामुळे कार व ट्रक यांचा अपघात झाला. जीजे-१०-टीव्ही-९९३५ क्रमांकाच्या ट्रकने एमएच-१९-सीयू-०९४९ या क्रमांकाच्या कारला धडक दिली. यात कारमधील तिघे बालंबाल बचावले. कार मुंबईहून जळगावच्या दिशेने जात होती.