विनाकारण फिरणारे तीन जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST2021-04-16T04:16:10+5:302021-04-16T04:16:10+5:30
जळगाव : जिल्हा पोलीस दल व आरोग्य विभागाकडून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची थेट रस्त्यावरचं अँटिजन चाचणी करण्याची मोहीम ...

विनाकारण फिरणारे तीन जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह
जळगाव : जिल्हा पोलीस दल व आरोग्य विभागाकडून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची थेट रस्त्यावरचं अँटिजन चाचणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी सिंधी कॉलनी भागात विनाकारण फिरणारे तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
दिवसेंदिवस कोरोना बाधित आढळून येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने काही निर्बंध घालून दिले आहे. दुसरीकडे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या रात्रीच्या संचारबंदीमध्ये विनाकारण फिरताना आढळून येणाऱ्यांची रस्त्यावर अँटिजन चाचणी केली जात आहे. गुरुवारी पोलीस व आरोग्य विभागाकडून सिंधी कॉलनी भागात ७३ विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजेन चाचणी
करण्यात आली. त्यामध्ये ३ व्यक्तींचा कोरोना अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना लागलीच रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले.