शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

जळगावात दुचाकीवरुन आलेल्या टोळक्याकडून तिघांना बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 22:20 IST

जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकांच्या भेटीसाठी आलेल्या तिघांना दुचाकीवरुन आलेल्या १० ते १५ जणांच्या टोळक्याने लाथाबुक्यांनी व फायटरने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी साडे तीन वाजता जिल्हा रुग्णालय आवारात घडली. यात सुलेमान खान अब्दुल खान (वय २३), गुड्डू काकर सलीम (वय २५) व सलमान शेख मेहबुब काकर (वय १९) तिन्ही रा.तांबापुरा, जळगाव) हे जखमी झाले आहेत. हल्ल्याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालय आवारातील घटना  उपचार करणा-या डॉक्टरलाही धक्काबुक्कीदंगा नियंत्रण पथकाला केले पाचारण

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,३१ : जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकांच्या भेटीसाठी आलेल्या तिघांना दुचाकीवरुन आलेल्या १० ते १५ जणांच्या टोळक्याने लाथाबुक्यांनी व फायटरने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी साडे तीन वाजता जिल्हा रुग्णालय आवारात घडली. यात सुलेमान खान अब्दुल खान (वय २३), गुड्डू काकर सलीम (वय २५) व सलमान शेख मेहबुब काकर (वय १९) तिन्ही रा.तांबापुरा, जळगाव) हे जखमी झाले आहेत. हल्ल्याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तमीजाबी शेख रहेमान ही महिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याने सुलेमान, सलमान व गुड्डू हे तिन्ही जण रविवारी दुपारी साडे तीन वाजता रिक्षाने जिल्हा रुग्णालयात आले. रिक्षातून उतरताच दुचाकीवरुन आलेल्या दहा ते पंधरा जणांनी या तिघांवर हल्ला चढविला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालय आवारात पळापळ झाली.डॉक्टरलाही  धक्काबुक्कीफायटरने मारहाण झाल्यामुळे तिन्ही तरुणांच्या डोक्याला व तोंडाला जबर मार लागला. रक्तबंबाळ अवस्थेत हे तिन्ही तरुण आपत्कालिन विभागात गेले. तेथील वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रवीण बोदडे यांनाही मारहाणकर्त्यांनी धक्काबुक्की केली. आपण डॉक्टर आहोत, तुमची पोलिसांकडे तक्रार करतो असा दम भरल्यानंतर मारहाण करणा-यांनी तेथून पळ काढला. दरम्यान, डॉक्टरला मारहाण कोणी केली याबाबतडॉ.बोदडे यांना  विचारले असता जखमीचे नातेवाईक होते की त्यांना मारहाण करणारे होते याबाबत ठामपणे सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवीगाळ करणाºयामध्ये एका जणाचे आडनाव सोनवणे होते असे डॉ.बोदडे म्हणाले.

रुग्णालयात तणावाची स्थितीतीन तरुणांना फायटरने मारहाण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जखमी गटाच्या लोकांची मोठी गर्दी जिल्हा रुग्णालयात झाली होती. दरम्यान, तणावसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त व दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, परिविक्षाधीन उपअधीक्षक धनंजय पाटील, जिल्हा पेठच निरीक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींकडून माहिती जाणून घेतली. पोलिसांचा ताफा दाखल झाल्यानंतर गर्दीवर नियंत्रण आले.