दुचाकी कंटेनर अपघातात तीनजण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2017 00:24 IST2017-01-08T00:24:22+5:302017-01-08T00:24:22+5:30
मुक्ताईनगर- ब:हाणपूर रोडवरील कर्की फाटय़ाजवळ दुचाकी व कंटेनर अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी 4.30 वा. घडली.

दुचाकी कंटेनर अपघातात तीनजण गंभीर
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर- ब:हाणपूर रोडवरील कर्की फाटय़ाजवळ दुचाकी व कंटेनर अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी 4.30 वा. घडली. जखमी तालुक्यातील वडोदा येथील रहीवाशी आहेत. त्यांना पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. कर्की फाटय़ाजवळ गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहीती अशी वडोदा येथील राजू तुकाराम खिरळकर यांच्या फिर्यादीनुसार कर्कीकडून मुक्ताईनगरकडे दुचाकी क्र. (एम. एच.29 टी.29 टी 8048) वर खिरळकर, संतोष समाधान मांडोकार व अनिल शालिग्राम खिरळकर तिघेही येत असताना, समोरुन वेगाने आलेल्या कंटेनर क्र.(एच.आर.47 सी.2933) ने दुचाकीस जोरदार धडक दिली.त्यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. फिर्यादीवरुन चालक (नाव गाव माहीत नाही) कंटेनर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक सचिन इंगळे करीत आहे. (वार्ताहर)