भुसावळात व्हेंटिलेटरअभावी कोरोनाचे तीन रुग्ण दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 03:03 PM2021-03-18T15:03:32+5:302021-03-18T15:04:06+5:30

ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरला १० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, पण ते हाताळण्यासाठी यंत्रणा नाही.

Three patients of Corona died due to lack of ventilator in Bhusawal | भुसावळात व्हेंटिलेटरअभावी कोरोनाचे तीन रुग्ण दगावले

भुसावळात व्हेंटिलेटरअभावी कोरोनाचे तीन रुग्ण दगावले

Next


भुसावळ : कोरोनाने जिल्ह्यासह तालुक्यात कहर केला आहे. भुसावळ शहरातील जळगाव रोडवरील साकेगाव हद्दीत असलेल्या ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनसुद्धा व्हेंटिलेटरअभावी तीन रुग्ण दगावले. यात दोन पुरुष तर एक महिलेचा समावेश आहे.
१७ रोजी रात्री बोदवड तालुक्यातील ६० वर्षीय पुरुषास रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच गंभीर अवस्था होती, सात तास वेगवेगळे रुग्णालय फिरुनसुद्धा व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने ते भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरला दाखल झाले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय १८ रोजी सकाळी कासोदा, ता.एरंडोल येथील ६० वर्षीय पुरुष, न्हावी, ता.यावल येथील ६० वर्षीय महिला यांनाही व्हेंटिलेटरची नितांत आवश्यकता असताना वेळेवर व्हेंटिलेटर उपलब्ध न होणे, तांत्रिक अडचणी, याशिवाय अत्यंत कमी झालेले सँच्युरेशन व उपचाराला झालेला उशीर यामुळे मृत्यू ओढवला.
दरम्यान, आजारांमध्ये कुठल्याही प्रकारची लपवालपवी न करता सुरुवातीलाच निदान केल्यास जास्त त्रास होत नाही. तरी बाधित रुग्णांनी त्वरित कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घ्यावे. वेळेवर उपचार करावा, अशी माहिती ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर चौधरी यांनी ह्यलोकमतह्णला दिली.

एक दृष्टिक्षेप
भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी ४० बेड उपलब्ध आहेत. मात्र यापेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना या ठिकाणी भरती केले आहे.
या रुग्णालयात पीएम केअर निधीतून सात महिन्यांपूर्वी १० व्हेंटिलेटर देण्यात आले होते. या ठिकाणी पुरेसे डॉक्टर व कर्मचारी नसल्यामुळे हे व्हेंटिलेटर धूळखात पडून आहेत.
कोरोना पॉझिटिव रुग्णांना व्हेंटिलेटरअभावी आपला जीव गमवावा लागला आहे.
व्हेंटिलेटरची सुविधा सुरू करण्यासाठी तज्ज्ञ चार एमडी डॉक्टर व प्रशिक्षित तज्ज्ञ १० आयसीयू ट्रेनर नर्सेस यांची गरज आहे.

Web Title: Three patients of Corona died due to lack of ventilator in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.