नशिराबादला रस्त्यावर आढळले तीन महिन्यांचे बाळ
By Admin | Updated: January 10, 2017 00:57 IST2017-01-10T00:57:45+5:302017-01-10T00:57:45+5:30
जुन्या महामार्गावर रस्त्याच्या कडेला तीन महिन्याचे पुरुष जातीचे जीवंत बाळ उघडय़ावर टाकून दिल्याचे आढळून आल

नशिराबादला रस्त्यावर आढळले तीन महिन्यांचे बाळ
नशिराबाद : जुन्या महामार्गावर रस्त्याच्या कडेला तीन महिन्याचे पुरुष जातीचे जीवंत बाळ उघडय़ावर टाकून दिल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. याबाबत राजेंद्र दगडू रोटे यांनी माहिती दिल्यावरुन नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल आहे.
जुन्या महामार्गालगत गोधडीत गुंडाळलेले तीन महिन्याचे जीवंत बाळ कुणीतरी टाकून दिले होते. त्याच्या रडण्याच्या आवाजावरुन ही घटना उघडकीस आली. त्या निर्दयी व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, उपनिरीक्षक अशोक खरात, नीळकंठ महाजन, शांताराम तळेले, सरला देवरे यांनी घटनास्थळी धाव घेवून बाळास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याबाबत न्यायालयाने बाळास रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. (वार्ताहर)