भुसावळ येथे चोरी प्रकरणी आरोपीस तीन महिने शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:43 IST2018-08-11T00:39:54+5:302018-08-11T00:43:52+5:30
चहा आणि रसवंतीच्या दुकानातून चोरी करणाऱ्या आरोपीस तीन महिन्याची शिक्षा भुसावळ येथील न्यायालयाने शुक्रवारी सुनावली आहे.

भुसावळ येथे चोरी प्रकरणी आरोपीस तीन महिने शिक्षा
भुसावळ, जि. जळगाव : चहा व रसवंतीच्या दुकानात चोरी केल्याप्रकरणी आरोपी समाधान रघुनाथ कोळी (२५) रा. टाकरखेडा, ता. जामनेर यास येथील न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे . न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी विनोद मिठाराम धांडे (वय ४६) यांचे चहा व रसवंतीचे दुकान शहरातील जामनेर रोडवर असून त्यांच्या दुकानात आरोपी कोळी याने १२ जून २०१८ रोजी चोरी केल्याबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८५/१८, भा.दं .वि .कलम ३७९, ५११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीविरुद्ध सदर गुन्हा सिद्ध झाल्यामुळे त्याला तीन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे .कॉ.जयराम खोडपे यांनी केला होता.