तीन लाखांचा एलबीटी कर चौघांकडून वसूल
By Admin | Updated: November 19, 2014 13:52 IST2014-11-19T13:43:15+5:302014-11-19T13:52:49+5:30
एलबीटी कर महापालिका क्षेत्रात चुकविणार्या चार व्यापार्यांकडून तपासणी पथकाने तीन लाख रुपयांच्या दंड वसुलीची कारवाई आज केली.

तीन लाखांचा एलबीटी कर चौघांकडून वसूल
धुळे : एलबीटी कर महापालिका क्षेत्रात चुकविणार्या चार व्यापार्यांकडून तपासणी पथकाने तीन लाख रुपयांच्या दंड वसुलीची कारवाई आज केली.
शहरात वाहनांद्वारे माल आणताना एलबीटी कर चुकविणार्या व्यापारी व व्यावसायिकांवर कारवाईसाठी विशेष पथकाची नियुक्ती महापालिका प्रशासनाने केली आहे. या पथकाने मंगळवारी सतीदेवी प्लायवूडच्या व्यापार्याकडून ४३६६ रुपये, आसाराम टी. प्रोसेसिंगकडून २६00 रुपये, नवकार पॉलिनरकडून ९000 रुपये व स्टेशन रोडवरील देशी दारू विक्रेत्याकडून २ लाख ८३ हजार ७९४ रुपयांचा कर वसूल केला.
अधीक्षक किशोर सुडके, आर.बी. सोनवणे, एस.डी. वाडिले, बी.एम. कुलकर्णी, संजय आगलावे यांच्या पथकाने ही कारवाई केली.