शिष्यवृत्तीसाठी विद्यापीठाला तीन लाखांचा धनादेश सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:17 IST2021-09-03T04:17:22+5:302021-09-03T04:17:22+5:30
जळगाव : विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेतील एम.एस्सी. संगणकशास्त्र विषयात प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या अराखीव विद्यार्थिनीस दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यासाठी ...

शिष्यवृत्तीसाठी विद्यापीठाला तीन लाखांचा धनादेश सुपूर्द
जळगाव : विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेतील एम.एस्सी. संगणकशास्त्र विषयात प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या अराखीव विद्यार्थिनीस दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यासाठी डॉ. ऊर्मिला पाटील यांनी वडील स्वातंत्र सैनिक कै. नरहर केशवराव साळुंखे यांच्या स्मरणार्थ तीन लाख रुपयांचा धनादेश विद्यापीठाकडे सुपूर्द केला.
डॉ. ऊर्मिला पाटील यांचे वडील चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथील असून स्वातंत्र्य सैनिक म्हणून ते परिचित होते. त्याच्या स्मरणार्थ एम.एस्सी. संगणकशास्त्र विषयात प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या अराखीव विद्यार्थिनीस दरवर्षी रोखीने समान स्वरूपात शिष्यवृत्ती देण्यासाठी तीन लाख रुपयांचा धनादेश प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही. पवार यांच्याकडे सुपूर्द केला. पंकज साळुंखे, अर्चना साळुंखे, योगेश साळुंखे, कमल साळुंखे, डॉ. ऊर्मिला पाटील, कुसुम पवार आदी कुटुंबीयांच्या सहयोगाने ही देणगी देण्यात आली. यावेळी प्रभारी वित्त व लेखा अधिकारी प्रा. मधुलिका सोनवणे, उपवित्त अधिकारी एस.आर. गोहिल, कमल साळुंखे, कुसुम पवार, जितेंद्र गोहिल आदी उपस्थित होते.