बिबट्याच्या हल्ल्यात वनपालासह तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:26 AM2019-03-13T11:26:40+5:302019-03-13T11:27:40+5:30

जळगाव तालुक्यातील देऊळवाडा, सुजदे शिवारात थरार

Three injured with plagiarism attack | बिबट्याच्या हल्ल्यात वनपालासह तीन जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात वनपालासह तीन जखमी

Next
ठळक मुद्दे शेतकऱ्यांमध्ये भीती


जळगाव : तालुक्यातील देऊळवाडे व सुजदे शिवारात मंगळवारी बिबट्याने धुमाकूळ घातला. शेतात काम करीत असलेल्या तरुणावर हल्ला केल्यानंतर बिबट्याच्या शोधासाठी आलेल्या वनपालासह आणखी एका शेतकऱ्यावर त्याने हल्ला केला. बिबट्याच्या या हल्लयामुळे गावकरी व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, प्रमोद संजय सोनवणे (२०), देवचंद लक्ष्मण सोनवणे (५७, दोन्ही रा.देऊळवाडा, ता.जळगाव) या दोघांसह वनविभागाचे वनपाल जी.आर.बडगुजर (५१, रा.जळगाव) हे बिबट्याच्या हल्लयात जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. प्रमोद व देवचंद काका-पुतणे आहेत.
बिबट्या व तरुणात दहा मिनिटे झुंज
देऊळवाडे येथील प्रमोद संजय सोनवणे हा तरुण शेतमजुर असून मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सुजदे शिवारातील दुसºयाच्या शेतात दादर कापण्याच्या कामासाठी गेला.
दादर कापून झाल्यावर प्रमोद शेतातून घराकडे निघत असताना, पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला चढविला. दोघांमध्ये १० मिनिटे झुंज चालली. यात प्रमोदने बिबट्याच्या मानेखाली बुक्का मारल्याने बिबट्या पळून गेला. यानंतर प्रमोदला त्याचा मित्र प्रकाश शालिक सोनवणे याला दुचाकीवरुन जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
बिबट्याने त्याच्या पाठीवर, दंडावर हातावर पंजे मारल्याने दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
पुतण्यानंतर वृध्द काकावर हल्ला
प्रमोद हल्ला झाल्यानंतर दुपारी याच बिबट्याने दुसºया शेतात त्याचे वृध्द काका देवचंद लक्ष्मण सोनवणे यांंच्यावर हल्ला चढविला.
देवचंद सोनवणे पिकाला पाणी भरण्यासाठी आले होते. पाणी भरत असताना काही कळण्याच्या आत त्यांच्यावर हल्ला झाला. यात त्यांच्या खाद्यावर, पोटावर जखमा झाल्या असून त्यांनाही त्याच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
बिबट्याच्या शोधार्थ फिरणाºया वनपालावरही हल्ला
बिबट्याच्या हल्लयाची माहिती मिळाल्यानंतर जळगाव परिक्षेत्रातील वनक्षेत्रपाल एन.जी.पाटील, वनपाल पी.जे.सोनवणे, वनपाल जी.आर.बडगुजर यांच्यासह २५ते ३० जणांना फौजफाटा दुपारी दीड वाजता बिबट्याला पकडण्यासाठी साहित्य तसेच वाहनासह सुजदे, देऊळवाडे शिवारात दाखल झाले. बिबट्याचा शोध सुरु असताना दबा धरुन बसलेल्या बिबट्याने वनपाल बडगुजर यांच्यावर हल्ला केला.पोटावर तसेच दोन्ही मांड्यांवर चावा घेतल्याने बडगुजर जखमी झाले आहेत. इतर सहकाºयांनी त्यांना रुग्णालयात आणले.
बिबट्याला पकडण्यासाठी लावले दोन पिंजरे
वनविभागाचे उपवनसंरक्षक डी.डब्ल्यू. पगार यांना देऊळवाडे येथे बिबट्याने वनपालासह ग्रामस्थांवर हल्ला केल्याचे समजताच ते स्वत: सहकाºयांसह घटनास्थळी दाखल झाले. तातडीने बिबट्याला पकडण्यासाठी एक पिंजरा लावण्यात आला. तर दुसरा पिंजराही मागविण्यात आला. सायंकाळी उशिरा दुसरा पिंजरा लावण्यात येत असल्याची माहिती पगार यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Three injured with plagiarism attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.