९० वर्षीय वृद्धासह तिघांनी घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:15 IST2021-09-25T04:15:55+5:302021-09-25T04:15:55+5:30
जळगाव : पिंप्राळा येथे मनपाच्या सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्याने व आसोद्यातील तरुण शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, तर ...

९० वर्षीय वृद्धासह तिघांनी घेतला गळफास
जळगाव : पिंप्राळा येथे मनपाच्या सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्याने व आसोद्यातील तरुण शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, तर रामेश्वर कॉलनीतील २८ वर्षीय तरुणाने पोटाच्या आजाराला कंटाळून घरातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६.४० वाजता उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनांप्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, दोन घटनांमधील आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही.
घटना क्र.१
सेवानिवृत्त मनपा सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या
महानगरपालिकेतील सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवराम शंकर सोनवणे (९०, रा. पिंप्राळा) असे मयताचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी मुलाचा मृत्यू झाल्यामुळे शिवराम सोनवणे हे सुनेसह पिंप्राळा येथे वास्तव्यास होते. गुरुवारी सून बाहेरगावी गेली असल्यामुळे सोनवणे हे घरात एकटेच होते. त्यांनी घरातील दरवाजाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री आठ वाजेच्या सुमारास सून घरी परतल्यावर सासरे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यावेळी त्यांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच, रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सीएमओ डॉ. नीता भोळे यांनी खबर दिली. त्यांच्या पश्चात सून, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
-------
घटना क्र. २
आसोद्यातील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा
आसोद्यातील ३६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजेपूर्वी घडली. रमेश अशोक पाटील असे मयताचे नाव असून, याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आसोदा येथील रहिवासी रमेश अशोक पाटील हे शेतीकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. गुरुवार, दि.२३ सप्टेंबर रोजी त्यांच्या पत्नी ह्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या, तर दोन्ही मुली कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यामुळे रमेश हे घरात एकटे होते. सायंकाळी ७ वाजेच्या पूर्वी त्यांनी घरातील पुढच्या खोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी पत्नी शेतातून घरी परतली तेव्हा त्यांना पतीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून लागलीच जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून पाटील यांना मृत घोषित केले. सीएमओ डॉ. नीता भोळे यांच्या खबरीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक किरण आगोणे करीत आहेत. रमेश यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.
-------