तीन उपकरणे राष्ट्रीय पातळीवर
By Admin | Updated: September 26, 2015 00:54 IST2015-09-26T00:54:44+5:302015-09-26T00:54:44+5:30
नंदुरबार : जिल्ह्यातील तीन विद्याथ्र्याच्या उपकरणांची राष्ट्रीय पातळीवर होणा:या इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.

तीन उपकरणे राष्ट्रीय पातळीवर
नंदुरबार : जिल्ह्यातील तीन विद्याथ्र्याच्या उपकरणांची राष्ट्रीय पातळीवर होणा:या इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, श्रॉफ विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य रवींद्र पोतदार याचा शाळेतर्फे नुकताच गौरव करण्यात आला. विज्ञान व तंत्रज्ञान विभाग व राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील 17 उपकरणांची त्यासाठी निवड करण्यात आली होती. राज्यभरातून 856 प्रकल्प सहभागी झाले होते. त्यापैकी 43 प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेकरिता निवड करण्यात आली. त्यात श्रॉफ विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य रवींद्र पोतदार याच्या ‘हायटेक क्लीन सिटी’ या प्रकल्पाची तसेच एकलव्य विद्यालयातील चिन्मयी धमेंद्र मराठे या विद्यार्थिनीचा ‘दामिनी द टोटल सिक्युरिटी’ आणि हेमांगी श्रीराम मराठे या तळोदा येथील नेमसुशील विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे ‘उष्णतेचे विविध प्रयोग’ या उपकरणांचा समावेश आहे. राष्ट्रीय प्रदर्शन 4 ते 8 डिसेंबर दरम्यान आयआयटी दिल्ली येथे होणार आहे. खान्देशात केवळ नंदुरबार जिल्ह्यातीलच सर्वाधिक उपकरणांचा समावेश असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी राधाकृष्ण गमे, शिक्षणाधिकारी सुभाष बोरसे यांनी अभिनंदन केले. श्रॉफ विद्यालयात आदित्य रवींद्र पोतदार याचा संस्थेचे अध्यक्ष अॅड.रमणभाई शाह, सचिव डॉ.योगेश देसाई आणि प्राचार्या सुषमा शाह यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शाळेचे विज्ञान शिक्षक मुकेश शाह व नितीन देवरे यांनी त्याला मार्गदर्शन केले. ----- नंदुरबारात झालेल्या प्रदर्शनात एकूण 223 उपकरणे मांडण्यात आली होती. त्यापैकी 17 उपकरणांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली होती. त्यात 12 उपकरणे ही नंदुरबार जिल्ह्यातील होती.